राष्ट्रीय गणतंत्र पार्टीचा ‘मविआ’ला बिनशर्त पाठिंबा
मुंबई, ता. २२ ः देशाच्या पंतप्रधानपदाच्या आरक्षणासाठी अंमलबजावणी केल्यास देशातील प्रत्येक घटकाला पंतप्रधानपदाचा लाभ मिळेल, अशी भूमिका घेत पंतप्रधानपदासाठीही आरक्षण लागू करण्याची मागणी लावून धरलेल्या राष्ट्रीय गणतंत्र पार्टीने राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला आणि त्यासोबतच महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.
राष्ट्रीय गणतंत्र पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रल्हाद गवारे यांनी यासाठीचा पाठिंबा जाहीर केला असल्याची माहिती मुंबईत दिली. आमच्या पक्षाकडून देशातील सर्व निवडणुका या बॅलेट पेपरवरच झाल्या पाहिजे, त्यासाठी ईव्हीएम हटावची मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात आहे. त्यासोबतच पंतप्रधानपदाच्या आरक्षणासाठी आम्ही आग्रही असून यासाठी राष्ट्रपतींकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करून त्यासाठीची भूमिका विशद केली आहे. देशातील एकूण जाती, त्यांचे राजकीय अधिकार याविषयी जागरूकता निर्माण करण्याची आमची ही चळवळ असून यासाठी देशातील एकूण परिस्थिती आणि राज्यातील मागील सव्वादोन वर्षांतील परस्थिती लक्षात घेऊन राज्यात पुरोगामी विचारांचे सरकार स्थापन व्हावे यासाठी आपला हा पाठिंबा आम्ही जाहीर केला असल्याची माहिती गवारे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. राज्यातील जनतेच्या हितासाठी बिनशर्त पाठिंबा दिला असल्याचेही प्रल्हाद गवारे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.