मुंबई

चुरशीच्या लढती

CD

चुरशीच्या लढती

ठाकरेंचा बालेकिल्ला शिंदेंच्या ताब्यात
मतदारसंघ - भांडुप पश्चिम
विजयी उमेदवार - अशोक पाटील
मताधिक्य - ६७६४

सुमारे पावने दोन लाख मराठी भाषिक मतदार असलेला भांडुप पश्चिम मतदारसंघ चुरशीच्या लढतीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अशोक पाटील यांनी अनपेक्षितपणे काबीज केला.

या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार रमेश कोरगावकर आणि मनसे नेते शिरीष सावंत रिंगणात होते. प्रचारादरम्यान भांडुपमध्ये मनसेची हवा होती, मात्र ती प्रत्यक्ष मतपेटीत उतरली नाही. दुसरीकडे भाजप कार्यकर्ते आणि समर्थक पाटील यांच्या विजयासाठी संपूर्ण ताकदीने मतदानासाठी उतरली. त्यामुळे पाटील यांना विजयी ७७७५४ मते पडली. कोरगावकर ७०९९० आणि सावंत यांनी २३३३५ मते घेतली.

१२व्या फेरीपासून आघाडी
ठाकरे गटाचे कोरगावकर पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते, मात्र १२ व्या फेरीपासून चित्र पालटले. तेथून अखेरच्या फेरीपर्यंत पाटील आघाडीवर राहिले. त्यामुळे अखेरच्या फेऱ्यांमध्ये शिंदे गट, पाटील आणि मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी केली.

अंतिम चित्र
विजयी उमेदवार- अशोक पाटील, शिवसेना (एकनाथ शिंदे)
मते- ७७७५४
पराभूत उमेदवार- रमेश कोरगावकर, शिवसेना ठाकरे गट,
मते- ७०९९०

कोट
सेनेच्या जीवावर सेनापती लढतो. आमचा सेनापती खरा, खमका आहे, हे या लढतीतून स्पष्ट झाले. हा विजय माझ्या एकट्याचा नाही, तर त्यात कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा सिंहाचा वाटा आहे.

अशोक पाटील,
विजयी उमेदवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT