मालाड पश्चिम मतदारसंघात विजयाची झुंज
काँग्रेसच्या अस्लम शेख यांनी अखेर गड राखला
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालाड पश्चिम मतदारसंघात विजयासाठी शेवटपर्यंत झुंज पाहायला मिळाली. काँग्रेसच्या माजी मंत्री व आमदार अस्लम शेख यांच्याविरोधात भाजपचे विनोद शेलार हे निकालात आघाडीवर होते; मात्र शेवटच्या फेऱ्यांमध्ये अस्लम शेख यांनी जास्त मताधिक्य घेत मालाड पश्चिमचा गड राखला. अस्लम शेख यांना ९८ हजार २०२ मते मिळाली.
मुंबई उपनगरातील सर्वात मोठा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालाड पश्चिम मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी मुख्य लढत होती. काँग्रेसकडून अस्लम शेख व भाजपकडून विनोद शेलार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. भाजपच्या विनोद शेलार यांनी काँग्रेसच्या अस्लम शेख यांना मागे टाकत सुरुवातीला मतमोजणीच्या १० फेऱ्यांमध्ये ११ हजारांची आघाडी घेतली होती; मात्र १८व्या फेरीनंतर ही तफावत हळूहळू कमी होत गेली. २०व्या फेरीनंतर अस्लम शेख यांनी आघाडी घेतली. जिंकण्याची आशा असतानाच शेलार यांना अखेर पराभव स्वीकारावा लागला.
धाकधूक आणि जल्लोष
काँग्रेसच्या अस्लम शेख हे पिछाडीवर असताना दुपारी कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक आणि शांतता होती. अस्लम शेख यांचे मताधिक्य वाढल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली. तर, सुरुवातीपासून जल्लोष करणारे भाजपचे कार्यकर्ते नंतर थंडावले.
अस्लम शेख (काँग्रेस) - ९८,२०२
विनोद शेलार (भाजप) - ९१,९७५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.