मुंबई

अभय योजना महावितरणला पावली

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजग्राहकांकडून १३० कोटी महावितरणने वसूल केले आहेत, तसेच ९३ हजार ८४८ ग्राहकांना अभय योजनेच्या माध्यमातून ५९ कोटींचे व्याज व दंडाची रक्कम भरण्यापासून सवलत मिळाली आहे.
वीजबिल भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या वीजग्राहकांचे वीज कनेक्शन महावितरणकडून कायमस्वरूपी कापले जाते. अशा ग्राहकांकडे १० हजार कोटींची थकबाकी असून, त्यांच्या वसुलीसाठी महावितरणने अभय योजना जाहीर केली आहे. १ सप्टेंबरपासून लागू केलेल्या या योजनेअंतर्गत डिसेंबरअखेरपर्यंत ९३ हजारहून अधिक ग्राहकांनी लाभ घेत १३० कोटींचा भरणा केला आहे, तर त्यांना ५७ कोटी ३६ लाखांचे व्याज व दोन कोटी १२ लाखांचा विलंब आकार माफ झाला आहे. या योजनेनुसार घरगुती, व्यावसायिक व इतर लघुदाब ग्राहक एकरकमी थकीत बिल भरतील त्यांना १० टक्के, तर उच्चदाब औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना पाच टक्के सवलत देण्यात आली आहे.
---------
थकबाकीचा भार जागामालकावर
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कोणत्याही जागेच्या मालक किंवा खरेदीदार किंवा ताबेदाराने वीजबिलाची थकबाकी भरणे बंधनकारक आहे. तसे केले नाही, तर कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यामुळे वीजग्राहकांनी सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा चौथा धक्का! सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

सकाळच्या गडबडीतही फिट राहण्यासाठी झटपट, हेल्दी आणि एनर्जीने भरलेला पीनट-बटर-बनाना रॅप, ५ मिनिटांत होतो तयार

आजचे राशिभविष्य - २५ मे २०२६

Panchang 25 May 2026 : पंचांग! सोमवारचे शुभ मुहूर्त, राहुकाळ, चंद्रबळ आणि धार्मिक विशेष जाणून घ्या

आजचे पंचांग आणि दिनविशेष - २५ मे २०२६

SCROLL FOR NEXT