मुंबई

अकरावीच्या मुंबईत मुबलक जागा

CD

अकरावीच्या मुंबईत मुबलक जागा
वाट्टेल त्या शाखेत प्रवेश मिळवण्याची विद्यार्थ्यांना संधी
मुंबई, ता. २५ ः मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या मुंबई विभागातील मुंबई, पालघर, रायगड, आणि ठाणे जिल्ह्यात यंदा अकरावीच्या प्रवेशासाठी मुबलक जागा उपलब्ध आहेत. यात मुंबई, ठाणे परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या अधिक जागा असल्याने या विभागात प्रत्येक विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल, असे चित्र आहे.
अकरावीच्या प्रवेशासाठी मुंबई, पालघर, रायगड, आणि ठाणे जिल्ह्यात एकूण एक हजार २६५ कनिष्ठ महाविद्यालये निश्चित करण्यात आली आहेत. या महाविद्यालयांमध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेसाठी चार लाख ६२ हजार २५० जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. यात येत्या काळात काही महाविद्यालयांना नवीन तुकडीवाढ झाल्यास त्यात आणखी जागांची भर पडू शकते, तर ग्रामीण भागात यंदाही काही नव्याने कनिष्ठ महाविद्यालये प्रवेशाच्या अखेरच्या टप्प्यात सुरू झाल्यास त्यांचीही संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्‍यामुळे मुंबई विभागात येणाऱ्या सर्व जिल्ह्यांमध्ये अकरावी प्रवेशासाठी कोणीही वंचित राहणार नसल्याचे दिसून येते.
मुंबईतील सेंट झेवियर्स, केसी महाविद्यालय, जयहिंद महाविद्यालय, रुईया महाविद्यालय आदी महाविद्यालयांमध्ये मागील वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेत कला शाखेची कटऑफ दुसऱ्या गुणवत्ता यादीनंतरही ९० टक्क्यांच्या वर होती, तर उर्वरित रुपारेल महाविद्यालय, साठ्ये महाविद्यालयासह वझे-केळकर, सीएचएम आदी महाविद्यालयांमध्येही कला शाखेला चांगली पसंती होती. त्‍यामुळे ७० ते ८५ टक्क्यांपर्यंत येथील प्रवेशाची कटऑफ दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीपर्यंत होती. यंदाही असेच चित्र दिसणार असले तरी जागा मुबलक असल्याने पहिल्या आणि तिसऱ्या फेरीपर्यंत सर्व प्रवेश पूर्ण होण्याची शक्यता आहे.
मुंबईत कला शाखेसोबत वाणिज्य शाखेकडे विद्यार्थ्यांना अधिक कल असतो. यंदा या शाखेसाठी सर्वाधिक दोन लाख २९ हजार ८७० जागा उपलब्ध आहेत. मागील वर्षी या शाखेची कटऑफ पहिल्या ते तिसऱ्या फेरीपर्यंत ९० टक्‍क्‍यांपर्यंत येऊन थांबली होती. यंदाही तसेच चित्र दिसण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मागील वर्षी विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा कलही दिसून आला होता, मात्र या शाखेची कटऑफ तिसऱ्या फेरीपर्यंत सेंट झेवियर्स, जयहिंद महाविद्यालय, पोद्दार महाविद्यालय, रुईया आदी महाविद्यालयांमध्ये ८० ते ९० टक्‍क्‍यांच्यादरम्‍यान राहिली होती.

मुंबई विभागातील एकूण जागा
शहर कला वाणिज्य विज्ञान एकूण
मुंबई 20,110 1,14,410 63,650 1,98,170
पालघर 13,605 26,480 19,925 6,0010
रायगड 11,840 17,740 18,080 47,660
ठाणे 25,860 71,240 59,340 1,56,440
एकूण 71,415 2,29,870 1,60,995 4,62,280

येथे करा नोंदणी
या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाच्या https://mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावर जाऊन आपली नोंदणी करणे अनिवार्य आहे. मागील आठवड्यात ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यांना पुन्हा नव्याने नोंदणी करणे आवश्यक आहे. या नोंदणीसोबत विद्यार्थ्यांना यापूर्वी देण्यात आलेल्या लॉगीन आयडी आणि पासवर्डचाच वापर करावा लागणार आहे. त्या माध्यमातून आपले पसंतीक्रम, महाविद्यालयांची निवड आदींची माहिती भरणे बंधनकारक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli west Building incident : मोठी बातमी! डोंबिवली पश्चिमेतील 25 कुटुंब राहत असलेली चार मजली इमारत खचली!

Rahul Gandhi and Mallikarjun Kharge: ...म्हणून यंदा राहुल गांधी अन् खर्गे लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला गेले नाहीत!

Lionel Messi चा तीन दिवसीय भारत दौरा, मुंबईत वानखेडेसह ब्रेबॉनवरही खेळणार, कधी आणि केव्हा? वाचा संपूर्ण वेळापत्रक

Love Jihad : हैदाराबादेत 'लव्ह जिहाद'चं प्रकरण उघडकीस; मूळचा पाकिस्तानी असणाऱ्या भामट्याने हिंदू मुलीला फसवलं अन्...

Maharashtra Rain Alert: पुढील दिवस महत्त्वाचे! मुंबईला मुसळधारेचा इशारा, महाराष्ट्रात कसे असेल हवामान?

SCROLL FOR NEXT