मुंबई

मलेरिया नियंत्रणासाठी महापालिकेचा पुढाकार

CD

मलेरिया नियंत्रणासाठी महापालिकेचा पुढाकार
५० हजार बांधकाम मजुरांची तपासणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : शहरात पावसाळा सुरू होताच मलेरियाच्या संसर्गाचा धोका वाढतो. विशेषतः बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी डासांची उत्पत्ती अधिक होते. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या कीटकनाशक विभागाने जून महिन्यात आतापर्यंत सुमारे ५० हजार बांधकाम मजुरांची मलेरिया तपासणी केली आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, यंदा १८ जूनपर्यंत मलेरियाचे २,३१४ रुग्ण नोंदवले गेले आहेत. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शहरातील ५० हून अधिक मजूर असलेल्या सर्व बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी मलेरियाची स्क्रीनिंग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित विकसकांनी मजुरांची चाचणी करणे बंधनकारक असून, वॉर्ड आरोग्य अधिकाऱ्यांनाही या मोहिमेत सहभागी होण्याचे निर्देश आहेत.
महापालिकेच्या पेस्ट कंट्रोल विभागाने यंदा जून महिन्यात ३०३३ बांधकाम ठिकाणांची पाहणी केली असून, ५०,०८५ मजुरांची मलेरिया तपासणी करण्यात आली. यामध्ये सात जणांना संसर्ग आढळल्याचे कार्यकारी आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

संक्रमणाचा धोका अधिक
बांधकाम ठिकाणी उघड्यावर पडलेले ड्रम, साचलेले पाणी, निकृष्ट स्वच्छतेमुळे मच्छर वाढीस उत्तेजन मिळते. मजुरांच्या राहण्याच्या झोपड्यांत मच्छरदानी, औषध व स्वच्छतेचा अभाव असल्याने मलेरिया जलद गतीने पसरतो, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यावरच संसर्ग ओळखून त्याची साखळी तोडणे आवश्यक असते.


नि:शुल्क तपासणी केंद्रे
मलेरियाची तपासणी महापालिकेच्या आपला दवाखाना, उपनगरी रुग्णालये आणि प्रमुख रुग्णालयांत पूर्णतः मोफत केली जाते.

मुख्य लक्षणे
अचानक थंडी व कंपनेने येणारा ताप, डाकेकेदुखी, स्नायू आणि सांध्यांचा वेदना, अतिथकवा, मळमळ, उलटी, भूक मंदावणे, काहीवेळा अतिसार व घाम येणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT