मुंबई

वाढ संप्रेरकाची कमतरता रुग्‍णांना दिलासा

CD

वाढ संप्रेरकाची कमतरता रुग्‍णांना दिलासा
केईएममध्ये ३०० हून अधिक मुलांची उंची वाढवण्यात यश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : काही मुलांची वाढ बालपणीच थांबते, त्यामागे हार्मोनल अडथळे कारणीभूत असतात. यालाच वाढ संप्रेरकाची कमतरता (जीएचडी) असे म्हटले जाते. अशा मुलांच्या उपचारांवर केईएम रुग्णालयाने लक्ष केंद्रित केले असून, आतापर्यंत ३०० हून अधिक मुलांची उंची उपचारांमुळे वाढली आहे.
केईएम रुग्णालयाच्या आण्विक अंतःस्रावी विभागात वाढ संप्रेरकाची कमतरता असलेल्या मुलांची आनुवांशिक चाचणी केली जाते. आतापर्यंतच्या तपासणीत ४३ टक्के मुलांमध्ये वाढीस अडथळा ठरणारे आनुवंशिक बदल आढळून आले आहेत. सात वर्षांच्या एका मुलाची उंची अवघी ९५ सेंटीमीटर होती. त्याचे वडील १२० सेंमी आणि आई १२४ सेंमी उंचीचे होते.
सहाय्यक प्राध्यापक डॉ. मंजरी कालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला वाढ संप्रेरक इंजेक्शन देण्यात आले. पहिल्याच वर्षात त्याची उंची १० सेंमीने वाढली असून, सध्या त्याची उंची १४५ सेंमी झाली आहे.
उंची वाढीचे निदान करण्यासाठी हाडांचा एक्स-रे, रक्तातील आयजीएफ-१ आणि आयजीएफ बीपी-३ प्रथिनांची तपासणी, मेंदूतील ग्रंथीचे एमआरआय स्कॅन केले जाते. पोषण, आजार, संप्रेरकांची कमतरता असे अनेक घटक मुलांच्या वाढीवर परिणाम करतात. भारतात दर ४ ते १० हजार मुलांमागे एकाला वाढ संप्रेरकाची कमतरता ही समस्या असते.

अशी आहेत लक्षणे...
- वर्षभरात मुलाची चार सेंमीपेक्षा कमी उंची वाढणे
- गोल चेहरा, शरीराचा गोल आकार आणि विलंबाने येणारे तारुण्य
- काही प्रकरणांत आयजीएफ-१ तयार होत नाही. त्यामुळे अशा रुग्णांना तसे इंजेक्शन द्यावे लागते.

उपचार महागडे
या उपचारांचा वार्षिक खर्च दोन ते तीन लाख रुपये असून, राष्ट्रीय दुर्मिळ रोग धोरण किंवा महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचाराची सोय उपलब्ध आहे. आवश्‍यक असल्यास तातडीने केईएम रुग्‍णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT