मुंबई

पालिका रुग्णालयांसाठी १,६०० कोटींची औषधे

CD

पालिका रुग्णालयांसाठी १,६०० कोटींची औषधे
प्रक्रिया लवकरच सुरू

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : मुंबई महानगरपालिकेने केईएम, नायर, सायन व कूपर या प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालय, विशेष रुग्णालय, प्रसूतिगृहे, आरोग्य केंद्रांसाठी एक हजार ६०० कोटी रुपयांची औषध खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रुग्णालयात पुरेसा औषधसाठा उपलब्ध होऊन, सर्वसामान्य रुग्णांचे पैसे वाचणार आहेत. सायन रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, औषध खरेदी प्रक्रिया लवकरच सुरू होईल. दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण होऊन औषधे उपलब्ध होतील.
रुग्णालयातील विविध औषधांच्या तुटवड्यामुळे उपचारांसाठी येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांना बाहेरून महागडी औषधे खरेदी करावी लागत आहेत. बाहेरून महागडी औषधे खरेदी करावी लागत असल्यामुळे अनेकांना उसने पैसे घ्यावे लागतात. काही सामान्य नागरिक वैद्यकीय उपचारासाठी अक्षरश: कर्जबाजारी होतात. याकडे अनेकदा राजकीय पक्षांसह सामाजिक संस्था व रुग्णांच्या नातेवाइकांनी लक्ष वेधले होते, मात्र रुग्णालयातील औषधाचा तुटवडा ‘जैसे थे’ आहे. आता यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच १२ कंपन्यांची औषधांचा पुरवठा करण्यासाठी नियुक्ती करण्यात येणार आहे.
या प्रक्रियेला किमान महिनाभराचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे गणपतीपूर्वी पालिकेच्या सर्वच रुग्णालयात पुरेसा औषध साठा व अन्य वैद्यकीय साहित्य उपलब्ध होईल, असे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, औषधांचे दरपत्रक एका आठवडाभरात काढले जाईल. दरपत्रक आल्यावर खरेदी प्रक्रिया सुरू होईल.
...
खर्च असा...
टॅबलेट व कॅप्सूल २१३,८६,५०,०००
वैद्यकीय साहित्य १७५,२०,७८,०००
इंजेक्शन व सेरा व्हॅक्सिन ५९३,९०,४८०००
सुया आणि सिरिंज ४७१,६५,००,०००
एक्स-रे फिल्म, केमिकल इसीजी रोल्स ५३,८०,००,०००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT