राजर्षी शाहू महाराज सन्मान योजना
३१ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन
मुंबई, ता. २ : राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजनेंतर्गत कला व साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या १०० ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना प्रति महिना पाच हजार रुपये मानधन देण्यात येते. या योजनेसाठी पात्र असलेल्या सर्व ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांनी ‘आपले सरकार’ पोर्टलवर ३१ जुलैपूर्वी अर्ज दाखल करावा, असे आवाहन संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘आपले सरकार’ पोर्टलवर https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. अर्जदाराने अर्जासोबत वयाचा दाखला, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र, पती-पत्नी एकत्रित छायाचित्र (लागू असल्यास), बँक पासबुकची प्रत, अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास), शासनाची इतर प्रमाणपत्रे (लागू असल्यास), नामांकित संस्था किंवा व्यक्तीकडून शिफारसपत्र (लागू असल्यास) ही आवश्यक कागदपत्रे जोडावीत, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
योजनेसाठी पात्रतेच्या अटी
योजनेसाठी लाभार्थ्याचे वय ५० वर्षांपेक्षा अधिक असावे आणि दिव्यांग कलाकारांसाठी वयोमर्यादा ४० वर्षे करण्यात आली आहे. कला किंवा साहित्य क्षेत्रात किमान १५ वर्षांचे योगदान आवश्यक आहे. विधवा, परित्यक्ता, दिव्यांग व वयोवृद्ध कलाकारांना प्राधान्य दिले जाणार आहे. लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न ६० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे. ज्यांची उपजीविका केवळ कलेवर अवलंबून आहे, अशा कलाकारांनाच प्राधान्य देण्यात येईल. लाभार्थी राज्य शासन किंवा केंद्र शासनाच्या कोणत्याही नियमित पेन्शन योजनेचा लाभार्थी नसावा. तसेच महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक या पात्रतेच्या अटी आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.