मुंबई

मध्य आणि हार्बर मार्गांवर रविवारी ब्लॉक

CD

मध्य आणि हार्बर मार्गांवर रविवारी ब्लॉक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी (ता. १३) मध्य रेल्वेच्या विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर आणि कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही.

मध्य रेल्वे
कुठे : विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान ५व्या व ६व्या मार्गावर
कधी : सकाळी ८.०० ते दुपारी १.३० पर्यंत
परिणाम : डाऊन मेल गाड्या, एक्स्प्रेस गाड्या वळविण्यात येणार आहेत, यामध्ये लांब पल्ल्याच्या गाड्या विद्याविहार स्थानकातून डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील, पाचव्या मार्गावर ठाणे येथे पुन्हा वळवल्या जातील. यामध्ये ट्रेन क्रमांक ११०५५ लोकमान्य टिळक टर्मिनस - गोरखपूर एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक ११०६१ लोकमान्य टिळक टर्मिनस - जयनगर पवन एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक १६३४५ लोकमान्य टिळक टर्मिनस -तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक १७२२२ लोकमान्य टिळक टर्मिनस - काकीनाडा टाऊन एक्स्प्रेसचा समावेश आहे. यामध्ये सीएसएमटीकडे येणाऱ्या काही गाड्या ब्लॉक कालावधीत ठाणे येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
====

हार्बर रेल्वे
कुठे : कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर
कधी : सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० पर्यंत
परिणाम : सीएसएमटीहून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ पर्यंत वाशी, बेलापूर, पनवेल येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील फेऱ्या आणि पनवेल, बेलापूर, वाशी येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ पर्यंत सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील फेऱ्या रद्द राहतील. ब्लॉक काळात सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी यादरम्यान विशेष उपनगरी गाड्या चालवल्या जातील.
===
पश्चिम रेल्वे
कुठे : सांताक्रूझ आणि गोरेगावदरम्यान अप जलद मार्गावर आणि पाचव्या मार्गिकेवर
कधी : शनिवारी (ता. १२) मध्यरात्रीनंतर १२. ३० ते रविवारी (ता. १३) पहाटे ४.०० वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत अप जलद मार्गावरील गाड्या गोरेगाव ते माहीमदरम्यान धीम्या मार्गावरून चालविण्यात येतील. तसेच रविवारी दिवसकालीन ब्लॉक असणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : अवजड वाहनांमुळे रस्ते बनले मृत्यूचे सापळे; पुण्यात अडीच वर्षांत २१४ जणांचा मृत्यू, १९२ गंभीर जखमी

भरणीतील चिठ्ठ्यांमधून निघणार OBC आरक्षण! सोलापूर जिल्ह्यात मंगळवारी सरपंचपदासाठी आरक्षण सोडत, जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या ‘या’ सूचना

Shravan Upvas Benefits: या श्रावणात ‘उपवास’ ठरेल आरोग्यासाठी वरदान! कारणे, फायदे व महत्त्व समजून घ्या

Beed News: अल्पवयीन पंधरा मुलांची थेट विक्रीच; गहूखेलमधील प्रकरणात बालसंरक्षण अधिकाऱ्यांची पोलिसांना माहिती

Pune Traffic : चाकण-भोसरी कोंडीबाबत स्वतंत्र बैठक, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; गृहनिर्माण सोसायटी पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

SCROLL FOR NEXT