मुंबई

वांद्र्यात चाळ कोसळून १२ जण जखमी

CD

वांद्र्यात चाळ कोसळून
१२ जण जखमी

दोघांची प्रकृती गंभीर

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : वांद्रे (पूर्व) येथील भारतनगर परिसरात शुक्रवारी (ता. १८) सकाळी ६च्या सुमारास दुमजली चाळ कोसळून बारा जण जखमी झाले आहेत. यात दोघांची प्रकृती गंभीर असून या घटनेनंतर झालेल्या सिलिंडर स्फोटात ते होरपळले आहेत. त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नमाज कमिटी मशिदीजवळ असलेली चाळ क्रमांक ३७ ही जीर्ण आणि धोकादायक स्थितीतील दोन मजल्यांची सिमेंट शीटची संरचना कोसळल्यानंतर सिलिंडरचा स्फोट झाला. मुंबई अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्यात दोन अतिरिक्त विभागीय अधिकारी, पाच वरिष्ठ अधिकारी, पाच फायर इंजिन्स, रेस्क्यू व्हॅन, पाण्याचा टँकर व १०८ ॲम्ब्युलन्स सेवा कार्यरत झाल्या होत्या. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोन जणांची सुटका करण्यात आली असून संपूर्ण परिसरात शोध व बचावकार्य सुरू आहे. वांद्रे येथील भाभा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद खाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जखमींपैकी रेहाना अन्सारी (वय ६५) व मोहम्मद अन्सारी (६८) हे दोघे अंदाजे ५० टक्के भाजले असून त्यांची स्थिती चिंताजनक आहे. त्यांना केईएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. उर्वरित १० जणांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर वांद्रे भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर म्हाडा, पीडब्ल्यूडी व महापालिका यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून इमारत कोसळण्यामागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. परिसरातील इतर जुन्या इमारतींचीही तपासणी सुरू करण्यात आली आहे.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT