मुंबई

कुचराई वा तडजोड खपवून घेणार नाही!

CD

कुचराई वा तडजोड खपवून घेणार नाही!
राज ठाकरे यांचा इशारा; महापालिकेची मोर्चेबांधणी सुरू

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरात नव्याने मोर्चेबांधणी करीत अनेक विधानसभानिहाय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या शनिवारी (ता. २६) केल्या. या वेळी ‘कामात कुचराई वा तडजोड खपवून घेतली जाणार नाही,’ असा इशारा राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.

राज ठाकरे यांनी विभाग अध्यक्षांच्या नवीन नियुक्त्या जाहीर केल्या. यासाठी काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या पक्षातील वरिष्ठ नेते आणि निवडक पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली होती. त्यानंतर या नियुक्त्यांवेळी पदाधिकाऱ्यांना इशारा देताना राज ठाकरे यांनी सांगितले, ‘पक्षाची ध्येयधोरणे आणि कार्यक्रम निष्ठेने राबवले गेले पाहिजेत. कुणीही समाजाला त्रास देणारे वर्तन करू नये आणि कोणताही हलगर्जीपणा माफ केली जाणार नाही.’ नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना दिलेल्या नियुक्तिपत्रात त्यांनी स्पष्ट केले, की या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती फक्त एक वर्षासाठीच आहे. त्या कालावधीत केलेल्या कामगिरीवरच पुढील मुदतवाढीचा निर्णय घेतला जाईल. राजकीय वर्तुळात हा निर्णय म्हणजे मनसेची नव्याने मांडणी आणि निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी घेतलेली आक्रमक उडी मानली जात आहे. त्यातच मनसे पुढील दिवसांत काही मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. नवीन बांधणी करीत असताना मात्र शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासोबतच्या युतीबाबत मनसेकडून मौन बाळगण्यात आले.

नवीन विभाग अध्यक्ष
महेश फरकासे – कांदिवली पूर्व
पांडुरंग राणे – दहिसर
विजय पवार – दहिसर सचिव
विश्वास मोरे – बोरिवली
भरत आर्य – जोगेश्वरी पूर्व
प्रदीप वाघमारे – कुर्ला
दिनेश पुंडे – मलबार हिल
रवींद्र शेलार – अणुशक्ती नगर
अनिल राजभोज – भांडुप पश्चिम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : कोरियन व्लॉगरसोबत भारतात घडली भयंकर घटना; “I hate India” म्हणत ढसाढसा रडली, तिच्यासोबत झालेल्या छळाचा व्हिडिओ व्हायरल

Pranjal Khewalkar: रेव्ह पार्टीत जावई अडकला; Eknath Khadse बघा काय म्हणाले? | Sakal News

एक-दोन नव्हे ३ ठिकाणी रंगली रात्र, खराडीआधी पब अन् फाइव्ह स्टारमध्ये पार्टी, छाप्यापर्यंत काय घडलं? टाइमलाइन आली समोर

Chh. Sambhajinagar News : मुलींना पालकांकडे परत पाठविण्याची घाई; विद्यादीप प्रकरणानंतर महिला बालविकास क्षेत्रात ‘भीती’

Latest Maharashtra News Updates: भुगावजवळ रस्त्यावर झाड कोसळले; गाडीत अडकलेले चौघे सुखरूप

SCROLL FOR NEXT