
छत्रपती संभाजीनगर : छावणी परिसरातील विद्यादीप बालगृहाची मान्यता शासनाने रद्द केली आणि इथल्या मुलींना वेगवेगळ्या बालगृहांत पाठवण्यात आले. पण, त्याहीपेक्षा या प्रकरणात छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांचे निलंबन झाले आणि याचा परिणाम असा झाला, की राज्यातील वेगवेगळ्या बालगृहांत विविध प्रकरणांत आलेल्या मुलींना कसेही करून पालकांकडे पाठवण्याला वेग आला. तथापि, याविषयीची अधिकृत आकडेवारी मिळालेली नाही आणि महिला बालविकास आयुक्तालयाने याला दुजोरा दिला नाही.