Video : कोरियन व्लॉगरसोबत भारतात घडली भयंकर घटना; “I hate India” म्हणत ढसाढसा रडली, तिच्यासोबत झालेल्या छळाचा व्हिडिओ व्हायरल

South Korean travel vlogger harassed in India : दक्षिण कोरियन व्लॉगर किम्सीचा भारतातील छळाचा अनुभव व्हायरल झाला आहे. “I Hate India” म्हणत तिचे अश्रूंना आवर राहिला नाही.
South Korean travel vlogger harassed in India she says I hate India
South Korean travel vlogger harassed in India she says I hate Indiaesakal
Updated on
Summary
  • कोरियन व्लॉगर किम्सीने भारतात त्रासाचा अनुभव शेअर करत भावनिक प्रतिक्रिया दिली.

  • तिचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भारतीयांनी सोशल मीडियावर माफी मागितली.

  • या घटनेने भारतातील परदेशी पर्यटकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.

Korean Woman Video : भारतात पर्यटनासाठी आलेल्या परदेशी पर्यटकांना अनेकदा आपल्या संस्कृती, ऐतिहासिक वारसा आणि वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृतीमुळे आकर्षित केलं जातं. मात्र, काही पर्यटकांना येथील वाईट अनुभवांमुळे मानसिक धक्का बसतो. असाच एक धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे, जिथे दक्षिण कोरियन ट्रॅव्हल व्लॉगर किम्सीने भारतातील आपल्या त्रासदायक अनुभवाची कहाणी शेअर करत “I Hate India” असे भावनिक उद्गार काढले. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, यावरून जोरदार चर्चा रंगली आहे.

South Korean travel vlogger harassed in India she says I hate India
Jatayu Video : रामायणानंतर पहिल्यांदाच दिसले जिवंत जटायू? बघ्यांची गर्दी; आश्चर्यकारक पक्ष्याचा व्हिडिओ व्हायरल..

छेडछाडीपासून अपघातापर्यंतचा प्रवास

किम्सी ही एक लोकप्रिय कोरियन ट्रॅव्हल व्लॉगर असून तिने आपल्या भारत सहलीचा व्ह्लॉग सोशल मीडियावर शेअर केला. सुरुवातीला उत्साहाने सुरू झालेल्या तिच्या प्रवासाने काही दिवसांतच वाईट वळण घेतले. रस्त्यावर फिरताना तिच्या मागे लागणं, सतत फोटोसाठी हट्ट करणं, तसेच असभ्य वर्तन यामुळे ती अस्वस्थ झाली. एका क्लिपमध्ये दिसतं की, दोन लहान मुले तिला सेल्फीसाठी विचारतात. तिने सौम्य नकार दिल्यावर त्यातील एकजण मुद्दाम तिला धक्काच देतो. तिच्या चेहऱ्यावरचा त्रास स्पष्ट दिसून येतो.

व्हिडीओमध्ये किम्सी एका ऑटोचालकाशी बोलताना दिसते, पण त्याचवेळी तिच्या अवतीभवती पुरुषांचा घोळका तयार होतो. तिच्या वैयक्तिक जागेचं उल्लंघन होत असल्याचं स्पष्टपणे दिसतं. या मानसिक दबावाचा शेवट एका दुर्दैवी मोटरसायकल अपघातात होतो. त्यानंतर तिने अश्रूंना आवर न घालता म्हटलं, “I Hate India”, ज्याने अनेक भारतीयांची मान खाली गेली.

South Korean travel vlogger harassed in India she says I hate India
Plane Accident Video : रस्त्यावर गाड्यांची वर्दळ अन् मधोमध कोसळलं विमान; झाला भीषण स्फोट; थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

या संपूर्ण प्रकाराबद्दल इंस्टाग्रामवर भारतीय कंटेंट क्रिएटर जलपना स्वेन यांनी माफी मागितली आहे. त्यांनी पोस्ट करताना लिहिलं, “माझ्या देशाच्या वतीने माफ करा”. या व्हिडीओने पुन्हा एकदा भारतातील महिला व परदेशी पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.

किम्सीच्या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या. काहींनी तिच्या सोबत झालेल्या वागणुकीचा निषेध करत भारतातील सामाजिक ढासळती परिस्थितीवर चिंता व्यक्त केली.
एक युजर म्हणतो, “जर हे असेच चालू राहिले, तर भारताला गंभीर सामाजिक-आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो.”
तर दुसऱ्या एका युजरने लिहिलं, “आपल्याच देशात महिला सुरक्षित नाहीत, तर परदेशी महिलांसाठी तर परिस्थिती आणखी वाईट आहे.”

South Korean travel vlogger harassed in India she says I hate India
Lover Video : बायकोने नवऱ्याला रंगेहाथ पकडलं; 2 महिने गर्लफ्रेंडसोबत फ्लॅटमध्ये लपलेला, नको त्या अवस्थेतला व्हिडिओ व्हायरल..

काहींनी तिला सहानुभूती दर्शवून लिहिलं, “कृपया पुन्हा भारतात येऊ नका. आम्हाला खूप लाज वाटते.” एका अन्य वापरकर्त्याने थेट म्हटलं, “ही संस्कृतीचं घाणेरडं रूप आहे, याचं कोणतंही समर्थन करता येणार नाही.”

भारत हे ऐतिहासिक, नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक वैविध्याने समृद्ध असलेलं देश आहे, पण अशा घटना देशाची प्रतिमा डागळवतात. परदेशी महिलांसोबतचा असा वागणूक फक्त भारताचं नाव खराब करत नाही, तर आपण सर्व भारतीय म्हणूनही जबाबदार ठरतो.

किम्सीने शेअर केलेला अनुभव एक इशारा आहे केवळ ‘अतिथी देवो भव’ म्हणणं पुरेसं नाही, तर त्या अतिथींची सुरक्षा, सन्मान आणि अनुभवही तितकाच महत्त्वाचा आहे. अशा घटना थांबवण्यासाठी प्रशासन, समाज आणि प्रत्येक नागरिकाने सजग राहणं अत्यावश्यक आहे.

South Korean travel vlogger harassed in India she says I hate India
Account Hacking Check : तुमचं कोणतं अकाऊंट हॅक झाल्यासारखं वाटतंय? पटकन चेक करा एका क्लिकवर..

FAQs

  1. Why did the Korean vlogger say "I Hate India"?
    👉 भारतात सतत छळ, पाठलाग, आणि शेवटी अपघाताचा अनुभव आल्यामुळे तिने हा उद्गार काढला.

  2. What happened in the viral video?
    👉 व्हिडीओमध्ये तिला मुलांनी त्रास दिला, रस्त्यावर पाठलाग केला आणि एक मोटारसायकल अपघात झाला.

  3. Did any Indian respond to this incident?
    👉 होय, जलपना स्वेन नावाच्या भारतीय क्रिएटरने सार्वजनिकपणे माफी मागितली.

  4. Where in India did this incident occur?
    👉 नेमके ठिकाण स्पष्ट नाही, पण व्हिडिओमध्ये ती एका भारतीय शहरात चालताना दिसते.

  5. Is India unsafe for foreign women travelers?
    👉 काही ठिकाणी परदेशी महिलांना त्रास होतो हे दुर्दैवी सत्य आहे, त्यामुळे योग्य खबरदारी आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com