मुंबई

मुंबईत पावसाचा जोर ओसरला

CD

मुंबईत पावसाचा जोर ओसरला
मुंबई, ता. २६ : शहरासह उपनगरांत शनिवारी (ता. २६) पावसाचा जोर कमी झालेला दिसला. दिवसभरात कुलाबा १.२ आणि सांताक्रूझ ३.७ मि.मी. पावसाची नोंद झाली. असे असले तरी गेल्या २४ तासांत दमदार पावसाची नोंद झाली. मलबार हिल, विक्रोळी, माटुंगा, घाटकोपर, वांद्रे, राम मंदिर आणि कांदिवली परिसरात चांगला पाऊस झाला. रविवारी सुट्टीचा मुहूर्त साधत मुंबईकर पावसाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडले.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत शहर भागात कुलाबा २१, सॅंडहर्स्ट रोड २०.१, माटुंगा २४.८६, मलबार हिल १९.५२ मि.मी. पाऊस झाला. पूर्व उपनगरांत घाटकोपर ३१.६, कुर्ला २०.५३, गोवंडी २१.७८, मुलुंड २२.३५, भांडुप ३०.६६, विक्रोळी २६ मि.मी. पावसाची नोंद झाली. आज सांताक्रूझ येथे कमाल तापमान २९.५ अंश सेल्सिअस, आर्द्रता ८९ टक्के नोंद झाली. कुलाबा येथे तापमान २९.४ अंश, आर्द्रता ९० टक्के नोंद झाली. यामुळे पावसाळी वातावरण असूनदेखील उकाडा जाणवला. रविवारी (ता. २७) शहर आणि उपनगरांत ढगाळ हवामानासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. कमाल तापमान ३० अंश आणि किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : कोरियन व्लॉगरसोबत भारतात घडली भयंकर घटना; “I hate India” म्हणत ढसाढसा रडली, तिच्यासोबत झालेल्या छळाचा व्हिडिओ व्हायरल

Land Scam : जिल्ह्यात वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये करणारी गँग; भूमाफिया, दलालांना महसूल अधिकाऱ्यांचा ‘आशीर्वाद’

Kolhapur Crime : कोल्हापूरच्या कळंबा कारागृहातून पळून जाताना कैद्याने वापरलेली मोटार सापडली

Manwat Crime : डोक्यात कुदळ मारून चालकाचा केला खून; झरी नाक्यावरील हॉटेलमधील घटना

Maruti Chitampalli : चितमपल्लींचे अप्रकाशित साहित्य होणार प्रकाशित; मराठा सेवा मंडळ व दख्खनी मराठा मंडळाने घेतली जबाबदारी

SCROLL FOR NEXT