मुंबई

राज्यात रक्तपेढ्यांतील सुविधांची तपासणी

CD

राज्यात रक्तपेढ्यांतील
सुविधांची तपासणी

केंद्रीय पथकाची केंद्रांना भेटी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्था (एनआयएसडब्ल्यूएफ)तर्फे मध्य प्रदेश, केरळ, तमिळनाडू, पंजाब, आसामसह महाराष्ट्रात रक्त संक्रमण सेवांची तृतीय पक्षामार्फत मूल्यांकन मोहीम राबवली जात आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेच्या (एनबीटीसी) निर्देशानुसार ही मोहीम सुरू आहे.

तपासणीसाठी ‘एनआयएसडब्ल्यूएफ’चे प्राध्यापक व प्रशासकीय नोडल अधिकारी डॉ. राजेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील पथक जुलै ते ऑगस्टच्या मध्यापर्यंत राज्यातील विविध रक्तपेढ्या, रुग्णालये आणि संबंधित संस्थांना भेट देणार आहेत. राज्यातील रक्त संक्रमण सेवांचे कार्य, पायाभूत सुविधा, सेवापद्धती आणि सेवा वितरण यांचा स्वतंत्र अभ्यास आणि मूल्यांकन करून सर्व रक्तपेढ्यांनी व संस्थांनी संबंधित अहवाल, नोंदी आणि अधिकारी उपलब्ध करून देऊन तपासणीसाठी पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
......
मूल्यांकनातून सुधारणा शक्य
तृतीय पक्ष तपासणी महाराष्ट्रासह इतर राज्यांतील रक्त संक्रमण व्यवस्थेतील सध्याच्या सामर्थ्यांचा आढावा घेऊन उणिवा ओळखून कार्यक्षमतावाढीच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे. परिपत्रकानुसार सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून ही प्रक्रिया सुरळीत पार पाडावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MP Congress MLA Agitation : म्हशीच्या वेषात आले कॉंग्रेस आमदार, सहकाऱ्यांनी वाजवली पुंगी; अनोख्या आंदोलनाची होतेय चर्चा

Nashik News : नाशिकमध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देणारे भोंगे बसणार; मनपाची तयारी सुरू

ENG vs IND: 'आरामखुर्चीत बसून मॅच पाहताना...' स्टोक्सवर टीका करणाऱ्यांना पीटरसनने सुनावलं; वाचा काय म्हणाला

Shaktipeeth Highway: ‘शक्तिपीठ’साठी चिंचोलीत पूजन करून जमीन मोजणी; शेतकऱ्यांचा मिळाला सकारात्मक प्रतिसाद

Koyna Dam: कोयना धरणाचे दरवाजे चार फुटांवर; पावसाचा जोर मंदावला, नदीपात्रात २१ हजार ८२४ क्युसेक विसर्ग

SCROLL FOR NEXT