मुंबई

कृत्रिम तलावांची संख्या वाढणार

CD

कृत्रिम तलावांची संख्या वाढणार
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची पालिकेची तयारी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : यंदाच्या गणेशोत्सवात अधिकाधिक पर्यावरणपूरक विसर्जन करण्यासाठी महापालिका कृत्रिम तलावांची संख्या वाढवणार आहे. गेल्यावर्षी २०४ कृत्रिम तलावांची उभारणी करण्यात आली होती. यंदा ही संख्या वाढवून विसर्जनासाठी सुविधा अधिक सुटसुटीत केली जाणार आहे, अशी माहिती उपआयुक्त व गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी दिली.
परळ येथील एफ दक्षिण विभागात आयोजित बैठकीत सपकाळे यांनी गणेश मंडळांना आवाहन केले, की नागरिकांनी पर्यावरणपूरक शाडू मूर्तींचा वापर करावा आणि कृत्रिम तलावातच विसर्जन करावे. शासनाच्या आदेशानुसार प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या घरगुती मूर्तींचे विसर्जन केवळ कृत्रिम तलावातच होणार आहे.
पालिकेडून मोफत शाडू माती, मंडपासाठी जागा आणि प्रायोगिक तत्त्वावर पर्यावरणपूरक रंग उपलब्ध करून दिले जातील. विसर्जनानंतर तलावातील गाळाचा पुनर्वापर केला जाणार असून, यावर महानगरपालिका देखरेख ठेवणार आहे.
बैठकीत सहभागी गणेश मंडळांनी विविध मागण्या मांडल्या. त्यामध्ये रस्त्यांवरील खड्डे, झाडांच्या फांद्यांची छाटणी, महिला भाविकांसाठी सुविधा, खाद्यपदार्थांतील भेसळ नियंत्रण आदी मुद्द्यांचा समावेश होता. पालिकेने या मागण्या योग्य प्रकारे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : पुणे जिल्ह्यात नराधमाचा अमानुषपणा! चिमुरडीच्या हत्येनंतर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; आरोपीला मिळणार मृत्यूदंडाची शिक्षा?

Latest Marathi News Live Update : कात्रज घाटात एसटी बंद पडल्याने भीषण ट्रॅफिक जॅम; वाहनांच्या ३-४ किमी लांब रांगा

Hasan Mushrif Statement : “गोकुळचा निकाल लागेल त्या दिवशी गुलाल लावूनच प्रतिक्रिया,” हसन मुश्रीफांनी शिवाजी पाटलांना थेट डिवचलं

Mumbai: पुनर्वसन ४० वर्षे रखडले; उच्च न्यायालयाचे केंद्र, ‘जेएनपीए’ला खडे बोल

Shahuwadi crime : कोल्हापुरातील मलकापूरमध्ये धक्कादायक घटना; सख्या भावानेच केला भावाचा खून, भाऊ फरार

SCROLL FOR NEXT