गोरेगाव येथील अवैध कॉल सेंटर उद्ध्वस्त
मुंबई, ता. ६ ः आभासी चलनात गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे प्रलोभन दाखवत नागरिकांचे बँक खाते साफ करण्याच्या उद्देशाने गोरेगाव येथे सुरू असले अवैध कॉल सेंटर परिमंडळ ११च्या विशेष पथकाने उद्ध्वस्त केले.
गोरेगाव पश्चिमेकडील अस्मी कॉम्प्लेक्समध्ये एका गाळ्यामध्ये बोगस कॉल सेंटर सुरू असून तेथून सर्वसामान्य नागरिकांना फसवणुकीच्या जाळ्यात ओढले जाते, अशी माहिती पथकास प्राप्त झाली. पडताळणी करून पथकाने तेथे छापा घातला. त्यात मालकासह चौघे मोबाइलद्वारे नागरिकांशी संपर्क साधून त्यांना प्रलोभन देत गुंतवणूक करण्यास भाग पाडताना आढळले. त्या चौघांना अटक करत कॉल सेंटरमधील लॅपटॉप, मोबाईल आणि अन्य उपकरणे पोलिसांनी जप्त केली. आरोपींनी फोरेक्स ट्रेडिंगसाठी फसवे संकेतस्थळ सुरू केले. ट्रेडिंगसाठी एक ॲप डाउनलोड करावे लागेल, असे सांगून संबंधित व्यक्तीचा ताबा आपल्याकडे घेता येईल, अशी सुविधा उपलब्ध करून देणारी लिंक त्यांना पाठवत. गुंतवणूकदार किंवा ट्रेडिंगसाठी उत्सुक व्यक्तीने ही लिंक क्लिक केली की त्याच्या मोबाइलचा ताबा घेऊन आरोपी त्याचे बँक खाते साफ करीत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.