मुंबईतील घरांच्या किमतीत वाढ
वाढत्या मागणीचा परिणाम; नाइट फ्रँकचा अहवाल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : देशाच्या अर्थव्यवस्थेचे ग्रोथ इंजिन म्हणून मुंबईसह ‘एमएमआर’कडे पाहिले जात असून, त्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. दुसऱ्या तिमाहीत आणि गेल्या वर्षभरात जागतिक स्तरावरील प्रमुख ४५ शहरांतील घरांच्या किमतीतील चढउताराच्या पार्श्वभूमीवर नाइट फ्रॅंक या संस्थेने आपला अहवाल जाहीर केला आहे. यामध्ये देशातील घरांच्या किमतीत बंगळूर शहरातील घरांच्या किमतीत सर्वाधिक १०.३ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे, तर मुंबईसह एमएमआरमधील घरांच्या किमती ८.७ टक्क्यांनी वाढल्या आहेत. जागतिक स्तरावरील अनेक शहरातील घरांच्या किमती घसरण होत असताना भारतीय बाजारात मात्र सकारात्मकता दिसत आहे.
जागतिक स्तरावर असलेली युद्धजन्य परिस्थिती, अस्थिरता, इंधनाच्या किमतीत होणारी वाढ आणि याचा थेट परिणाम गृहनिर्माण विभागावर होतो. त्यानुसार नाइट फ्रँक या संस्थेने जागतिक स्तरावरील प्रमुख ४५ शहरांतील घरांच्या किमतीचा अहवाल तयार केला आहे. त्यानुसार अनेक शहरांतील घरांच्या किमतीत वाढ होत असल्याचे दिसत असले तरी काही ठिकाणी या किमती कमीही झाल्या आहेत. नाइट फ्रँकच्या अहवालात दक्षिण कोरियाचे प्रमुख शहर असलेल्या सेऊल पहिल्या स्थानावर असून, तेथे जवळपास २५ टक्क्यांची वाढ झाली आहे. टोकियो दुसऱ्या स्थानावर असून, तेथे १६ टक्के एवढी, चौथ्या स्थानावर असलेल्या बंगळूरमध्ये १०.०२ टक्के, मुंबई सहाव्या स्थानावर असून, ८.७ टक्के, तर दिल्ली १५ स्थानावर असून, तेथे सुमारे ३.९ टक्क्यांची वाढ नोंदली आहे. घरांच्या मागणीत सातत्याने वाढ होत असल्यानेच किमतीचा आलेख चढता दिसत असून, ही बाब अर्थव्यवस्थेसाठी पोषक असल्याचे नाइट फ्रँकने म्हटले आहे. दरम्यान, अनेक शहरातील घरांच्या किमतीत घटही नोंदली आहे.
प्रमुख शहरातील किमतीत झालेली वाढ
सेऊल (दक्षिण कोरिया) - २५.२ टक्के
टोकियो (जपान) - १६.३ टक्के
दुबई (युएई) - १५.८ टक्के
बंगळूर (भारत) - १०.२ टक्के
मनिला (फिलिपाइन्स) - ९.१ टक्के
मुंबई (भारत) - ८.७ टक्के
बँकॉक (थायलंड) - ७.०१ टक्के
दिल्ली (१५ व्या स्थानी) - ३.९ टक्के
अस्थिरतेमुळे जगभरातील रियल इस्टेट क्षेत्रावर मंदीची छाया दिसत असतानाही भारतात मात्र ग्राहकांच्या विश्वासामुळे आणि त्यांच्याकडून होत असलेल्या घरखरेदी बाजारात स्थिरता दिसत आहे. तसेच आयटीसह सेवा क्षेत्रातील लोकांकडून घराची मागणी कायम असल्यानेच मुंबई, दिल्ली, बंगळूरमधील किमतीत वाढ नोंदली आहे.
- शिशिर बैजल, अध्यक्ष, नाइट फ्रॅंक इंडिया
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.