मुंबई

रिगल जंक्शन पुनर्रचनेला हेरिटेज समितीची तत्त्वत: मंजुरी :

CD

रिगल जंक्शन पुनर्रचनेला हेरिटेजची तत्त्वत: मंजुरी
- गर्दी कमी होण्यास मदत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : फोर्ट परिसरातील ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वपूर्ण रिगल जंक्शनच्या पुनर्रचनेला मुंबई हेरिटेज कंझर्वेशन कमिटीने तत्त्वत: मंजुरी दिली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात दोनमजली भूमिगत पार्किंग, पादचारी स्नेही सार्वजनिक चौक, आधुनिक सिग्नल प्रणाली आणि सुलभ वाहतूक व्यवस्थेचा समावेश आहे. यामुळे संग्रहालय परिसरातील गर्दी कमी होऊन पर्यटक व नागरिकांसाठी हा भाग अधिक आकर्षक व सुरक्षित होणार आहे.
योजनेनुसार रिगल जंक्शनखाली १५० हून अधिक वाहनांसाठी पार्किंगची सोय केली जाणार आहे. सध्या या परिसरात फक्त ३५ वाहनांसाठी पार्किंगची सुविधा आहे. पार्किंगवर सुमारे ४,००० चौ.मी.चा सार्वजनिक चौक (प्लाझा) उभारला जाणार आहे. त्यामध्ये बसण्याची व्यवस्था, खुली पायपीट करण्याची जागा तसेच सुंदर दृश्य अनुभवता येईल. या चौकातून छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, रिगल सिनेमा आणि पोलिस मुख्यालयाचे आकर्षक दृश्य पाहता येईल.
सध्याच्या वर्तुळाकार चौकाऐवजी सरळ चार-रस्त्यांचा चौक तयार करण्यात येईल. यासाठी २७ सिग्नल्स कमी करून आधुनिक ट्राफिक सिग्नल प्रणाली बसवली जाणार आहे. यामुळे वाहनांची हालचाल सुलभ होईल, गर्दी कमी होईल आणि पादचाऱ्यांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध होईल.

- आराखडा तयार
हा परिसर युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साइटमध्ये समाविष्ट असल्याने वारसा जपणे ही मोठी जबाबदारी आहे. मुंबई हेरिटेज कन्झर्वेशन समितीने मंजुरी देताना स्पष्ट केले आहे, की पार्किंगची संपूर्ण सोय भूमिगतच असावी आणि सार्वजनिक चौक कायम सर्वांसाठी खुला राहावा. त्यादृष्टीने आराखडा तयार करण्यात आला आहे.

कोट
या प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करण्याची गरज आहे. ही योजना राबवली तर परिसरातील गर्दी कमी होईल, पादचाऱ्यांसाठी अधिक जागा उपलब्ध होईल आणि पर्यटकांना चांगला अनुभव मिळेल. दीर्घकाळ विलंबामुळे परिसरातील समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे काम लवकर हाती घेणे गरजेचे आहे. याबाबत आपण महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे.
- मकरंद नार्वेकर, माजी नगरसेवक
......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT