मुंबई

महिलांसाठी आयआयटी मुंबईत जनरेटिव्ह एआयवर विशेष अभ्यासक्रम

CD

आयआयटीत जनरेटिव्ह एआयवर अभ्यासक्रम
देशविदेशातील महिलांना सुवर्णसंधी

मुंबई, ता. १८ : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्याद्वारे निर्माण झालेल्या विविध क्षेत्रात महिलांना अधिकाधिक संधी मिळावी यासाठी आयआयटी मुंबईच्या देसाई सेठी स्कूल ऑफ एन्टरप्रेन्योरशिप (डीएसएसई)ने महिला व्यावसायिक, उद्योजिका आणि व्यवस्थापकांना ‘जेनएआय फॉर बिझनेस: अ हँड्स-ऑन इंट्रोडक्शन’ नावाचा अभ्यासक्रम जाहीर केला आहे. हा अभ्यासक्रम ११ ते १३ सप्टेंबर २०२५ या काळात ऑनलाइन पद्धतीने सुरू होणार आहे. हा अभ्यासक्रम देशविदेशातील महिलांसाठी एक सुवर्णसंधी असेल.
जनरेटिव्ह एआयच्या वेगाने बदलणाऱ्या जगात एक सहाय्यक आणि सहयोगात्मक वातावरण पुरवतो. एआयसाठी नव्याने सुरुवात करणाऱ्या किंवा त्याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असलेल्या महिलांसाठी हा अभ्यासक्रम खास तयार केला आहे. या अभ्यासक्रमातून जनरेटिव्ह एआयची साधने सोप्या पद्धतीने समजावून सांगितली जातील. दैनंदिन कामात व व्यवसायाच्या विविध कार्यांमध्ये त्यांचा प्रभावी वापर कसा करावा, याचे मार्गदर्शन केले जाईल, अशी माहिती आयआयटी मुंबईकडून देण्यात आली.

तीन दिवसांचा अभ्यासक्रम
या तीन दिवसांच्या अभ्यासक्रमात, प्रामुख्याने चॅटजीपीटी, क्लाउड, जेमिनी, को-पायलट, डाल-इ, परप्लेक्सिटी, फ्लक्स १, ग्रोक आणि नोटबुक एलएम आदी यांसारख्या साधनांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. लाइव्ह प्रात्यक्षिके, सराव आणि प्रत्यक्ष उदाहरणांद्वारे भरती, एचआर, ग्राहक संबंध, मार्केटिंग, विक्री, धोरणात्मक नियोजन आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये जनरेटिव्ह एआयचा वापर कसा करता येतो, हे शिकवले जाणार आहे.
यात प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, प्रोजेक्ट ओळख, अंमलबजावणीचे नियोजन आणि एआयचा जबाबदार वापर यावरही व्यावहारिक मार्गदर्शन दिले आहे. त्यामुळे हा अभ्यासक्रम महिलांसाठी मोठी संधी असेल.

९ सप्टेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन
हा अभ्यासक्रम पूर्णपणे ऑनलाइन होईल. या अभ्यासक्रमाचे शुल्क १३ हजारांपर्यंत असेल. यात सहभागी महिलांना आयआयटीचे ‘सहभाग प्रमाणपत्र’ मिळणार आहे. यासाठी ९ सप्टेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT