संकटात सापडलेल्या विद्यार्थ्यांशी मंत्री चंद्रकांत पाटील साधणार संवाद
मुंबई, ता. १ ः उच्च व तंत्रशिक्षण आणि त्याअंतर्गत येणाऱ्या विविध व्यावसायिक आणि पारंपरिकच्या पदवी, पदविका, पदव्युत्तर आदी अभ्यासक्रमांचे राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या विविध प्रकारच्या अडचणी, त्यांचे प्रश्न थेट विद्यार्थ्यांकडूनच समजून घेण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी शुक्रवारी (ता. ३) दुपारी दोन वाजता ते विद्यार्थ्यांशी ऑनलाइन पद्धतीने थेट संवाद साधणार आहेत.
राज्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे अनेक जिल्ह्यांतील जनजीवन विस्कळित झाले आहे. त्यातच अनेक ठिकाणी व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू असताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी समजून घेण्यासाठी व त्यावर उपाययोजना करण्यासाठी विद्यार्थ्यांसोबत थेट ऑनलाइन माध्यमातून संवाद साधणार आहेत. दरम्यान, या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी व्यक्त केली आहे.
--
संवादासाठी लिंक
उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या अडीअडचणी या खालील लिंकवर जाऊन थेट मंत्र्यांसमोर सांगण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी खालील लिंकचा वापर करावा, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
https://zoom.us/j/९६५६२०६८५७७०pwd=VZijsz६YeCrn३MxgltHS३DJDZ१npaG.१
Meeting ID: ९६५ ६२०६ ८५७७
Passcode: ७८९१२८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.