नऊ वर्षांच्या चिमुरडीचे मृत्यूनंतर अवयवदान
मुलीची किडनी, यकृत, स्वादुपिंड आणि आतडे दान
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : मुंबईत एका नऊ वर्षे १० महिने वयाच्या चिमुरडीने आपले अवयवदान करीत अनेकांचे प्राण वाचवले. अलिबागच्या एका कुटुंबाने आपल्या मुलीचे अवयव दान केले. त्यामुळे अवयवाच्या प्रतीक्षेत असलेल्या इतर गरजूंना जीवदान मिळाले.
या मुलीची किडनी, यकृत, स्वादुपिंड आणि आतडे दान करण्यात आले. एक किडनी बाई जेरबाई वाडिया रुग्णालय फॉर चिल्ड्रन, दुसरी किडनी अपोलो रुग्णालय आणि यकृत नानावटी रुग्णालय येथे दान करण्यात आले. या मुलीच्या पालकांचे खरोखरच कौतुक आहे. त्यांनी मुलगी गमावूनदेखील समाजासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याची प्रतिक्रिया वाडिया हॉस्पिटलच्या डॉ. मिनी बोधनवाला यांनी दिली.
बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला म्हणाल्या, की मृत्यूनंतर एखाद्याच्या शरीरातील अवयव इतरांच्या जगण्याचे कारण ठरू शकतात. मात्र दुर्दैवाने समाजात आजही अवयवदानाबाबत माहिती आणि जागरूकता फारच कमी आहे.
एखाद्या मेंदूमृत (ब्रेनडेड) व्यक्तीचे अवयव गरजू आठ व्यक्तींचे प्राण वाचवू शकतात; मात्र समाजात पुरेशी जाणीव जागृती नसल्याने अवयव दानाचे प्रमाण अत्यल्प आहे. जगण्याची इच्छा असूनही प्रत्यारोपणासाठी आवश्यक अवयवच मिळत नसल्याने अनेक रुग्ण मृत्यूला कवटाळतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.