शालेय शिक्षणमंत्र्यांनी मागविला अहवाल
अहवालानंतर योग्य ते पाऊल उचलले जाणार
मुंबई, ता. ३१ : रोहित आर्या यांच्या अप्सरा मीडिया एंटरटेन्मेंट नेटवर्क प्रोजेक्टमधील ‘लेट्स चेंज’ या उपक्रमाअंतर्गत ‘स्वच्छता मॉनिटर’ या उपक्रमातील नेमकी वस्तुस्थिती काय होती, याचा सविस्तर अहवाल शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विभागाकडून मागविला आहे. या अहवालानंतर शालेय शिक्षण विभागातील कामकाजात काही त्रुटी आढळल्यास त्यासंदर्भात पुढील पावले उचलले जाणार असल्याचे संकेतही त्यांनी माध्यमांशी बोलताना शुक्रवारी (ता. ३१) दिले.
रोहित आर्याप्रकरणी शालेय शिक्षण विभाग अडचणीत आला आहे. आर्या याचे पोलिसांकडून एन्काउंटर झाल्यानंतर विभागाकडून गुरुवारीच त्याच्यासोबत विभागाकडून करण्यात आलेली कार्यवाही आणि त्यातील पुढील टप्पे याविषयी स्पष्टीकरण देण्यात आले. त्यात विभागाकडून स्वच्छता मॉनिटर संबंधात निघालेले आदेश समोर आल्याने याविषयी जोरदार टीका होत आहेत. सुरुवातीच्या दोन टप्प्यांमध्ये शालेय शिक्षण विभागाकडून ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानाच्या अंतर्गत स्वच्छता मॉनिटर हा उपक्रम राबवण्यात आला होता. त्यासाठी रोहित आर्या याला विभागाकडून काही निधीही वितरित करण्यात आला होता, परंतु टप्पा क्रमांक- २ साठी, रोहित आर्याने काही नियमांची पायमल्ली केल्याने त्यासंदर्भातील निधी आणि कार्यवाही थांबवण्यात आली होती. तरीही या प्रक्रियेमध्ये कोणत्या त्रुटी होत्या का, याचा तपासदेखील शालेय शिक्षण विभागाकडून केला जाणार आहे.
--
असे आहे प्रकरण
‘सीएसआर’च्या माध्यमातून सप्टेंबर २०२२ आणि जून २०२३ अशा दोन वेळा मान्यता देण्यात आल्या होत्या. यासाठी सुरुवातीला या कार्यक्रमासाठी या संस्थेला विभागाने रु.९,९०,००० इतकी रक्कमही देण्यात आली; मात्र त्यानंतर तिसऱ्यांदा २०२३-२४ मध्ये ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानांतर्गत दोन कोटींचा निधी स्वच्छता मॉनिटर टप्पा-२ हे अभियान राबविण्यासाठी शासन मान्यता देण्यात आली होती; मात्र, त्यात रोहीत आर्या यांनी यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमांचे पालन केले नसल्याचे निदर्शनास आल्याने स्वच्छता मॉनिटर टप्पा-२ उपक्रम शालेय शिक्षण विभागाकडून राबविण्यात आला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.