मुंबई

''डुप्लिकेट'' फॉर्म'',''ओरिजनल''वर भारी

CD

‘डुप्लिकेट फॉर्म’ ‘ओरिजनल’वर भारी
भाजपच्या बंडखोर लेडीने शिंदेंच्या सेनेला लोळवले

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १६ : महापालिका निवडणुकीत महायुतीमधील ‘दोस्ती’ आणि ‘कुस्ती’ दोन्ही पाहायला मिळाल्या; मात्र प्रभाग क्रमांक १७३ मधील राजकीय वर्तुळातील घडामोडींनी मोठी खळबळ उडाली आहे. भाजपच्या अधिकृत आदेशाला केराची टोपली दाखवत, चक्क एबी फॉर्मची ‘कलर झेरॉक्स’ जोडून निवडणूक लढवणाऱ्या शिल्पा केळुसकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेला जोरदार धोबीपछाड दिली आहे. त्यांनी शिंदे गटाच्या पूजा कांबळे यांचा १,७२२ मतांनी पराभव केला आहे.

मैत्रीपूर्ण लढत की राजकीय डावपेच
​प्रभाग १७३ची जागा महायुतीच्या जागावाटपात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडण्यात आली होती. माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्या पत्नी पूजा कांबळे रिंगणात होत्या, जागा हातातून गेल्याने संतापलेल्या भाजपच्या केळुसकर यांनी माघार न घेता बंडखोरी केली. विशेष म्हणजे, भाजपने त्यांचा एबी फॉर्म परत मागवला असतानाही, केळुसकर यांनी त्या फॉर्मची कलर झेरॉक्स आयोगाला सादर केली आणि अपक्ष नसून ‘भाजप’ म्हणूनच निवडणूक लढवली.

‘५० खोके’ विरुद्ध ‘फॉर्म चोर’
​या लढतीदरम्यान प्रचाराची पातळी चांगलीच खाली घसरली होती. प्रचारादरम्यान केळुसकर समर्थकांनी ‘५० खोके एकदम ओके’च्या घोषणा देत शिंदेंच्या उमेदवाराला सतत डिवचले. यामुळे शिंदे गटाच्या ‘प्रतिमेवर’ थेट घाला घालण्याचा प्रयत्न झाला. प्रत्युत्तरात शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी केळुसकरांना ‘एबी फॉर्म चोर’ म्हणत त्यांची खिल्ली उडवली; मात्र मतदारांनी ‘चोर’ म्हणण्यापेक्षा ‘खोक्यां’च्या घोषणेवर अधिक विश्वास दाखवल्याचे निकालातून स्पष्ट होत आहे.

भाजपच्या लेटर हेडला केराची टोपली
​हा निकाल म्हणजे केवळ शिंदे गटाचा पराभव नसून भाजपच्या मुंबई नेतृत्वाचीही नाचक्की मानली जात आहे. भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी स्वतः निवडणूक आयोगाला पत्र लिहून केळुसकर यांचा अर्ज बाद करण्याची विनंती केली होती; मात्र तांत्रिक मुद्द्यांवर आयोगाने तो अर्ज वैध ठरवला. आता ‘डुप्लिकेट’ फॉर्म लावून ‘ओरिजनल’ उमेदवाराला पाडणाऱ्या केळुसकर या भाजपमध्ये परतणार की, अपक्ष राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिंदे गटासाठी चिंतेची बाब
​हा पराभव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. ज्या मुंबई पालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी शिंदे यांनी आपली सर्व ताकद पणाला लावली आहे, तिथे त्यांच्याच मित्रपक्षातील कार्यकर्त्यांनी त्यांना उघड आव्हान देऊन पराभूत केल्याने महायुतीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.
............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live : शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नाना भानगिरे यांचा पराभव

BMC Mayor: मुंबईचा नवा महापौर कोण होणार? भाजपच्या 'या' पाच उमेदवारांच्या जोरदार चर्चा; कुणाला मिळणार संधी?

Devendra Fadnavis: मुंबईचा महापौर कोण होणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी पत्रकार परिषदेत दिले संकेत; म्हणाले...

U19 World Cup : वैभव सूर्यवंशीला चॅलेंज देणाऱ्या Sameer Minhasने शेपूट घातले, पाकिस्तानच्या संघाने इंग्लंडसमोर गुडघे टेकले

BJP Victory and Rasmalai trend : भाजपने जिंकली महापालिकांची लढाई अन् सोशल मीडायवर ट्रेंड होतेय 'रसमलाई'

SCROLL FOR NEXT