मुंबई

मुंबईत माघी गणेशोत्सवाची धामधूम

CD

मुंबईत माघी गणेशोत्सवाची धामधूम
दक्षिण मुंबईत भक्ती आणि सामाजिक उपक्रमांचा जागर
मुंबई, ता. १८ : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या माघी गणेशोत्सवासाठी मुंबईत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर, मलबार हिल आणि कुंभारवाडा परिसरात या उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. केवळ धार्मिक विधीच नव्हे, तर आरोग्य शिबिरे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून हा उत्सव सामाजिक ऐक्याचे प्रतीक बनला आहे.

वाळकेश्वर परिसरातील ‘वाळकेश्वरचा सम्राट’ हा माघी गणपती भाविकांसाठी विशेष आकर्षणाचे केंद्र आहे. या मंडळाचे वैशिष्ट्य असे की, येथे भाद्रपद गणेशोत्सवात मूर्ती प्रतिष्ठापना केली जात नाही; केवळ माघी गणेशोत्सवातच हा सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. यंदाही येथे पाच दिवसांच्या उत्सवाचे नियोजन करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष निखिल दीपक चौधरी यांनी दिली. मुंबईसोबतच उपनगरांतही माघी गणेशाची ओढ वाढताना दिसत आहे. विरार (पश्चिम) येथील वायके नगर अनेक्स मित्रमंडळाचा यंदा १६ वा माघी गणेशोत्सव आहे. मंडळाचे खजिनदार जयेश ठक्कर यांनी सांगितले की, पूर्वी भाद्रपद महिन्यात उत्सव साजरा केला जात असे, मात्र माघी उत्सवामुळे रहिवासी अधिक उत्साहाने एकत्र येतात. पाच दिवस पूजा आणि भंडारा अशा कार्यक्रमांमुळे येथे भक्तीमय वातावरण असते.

पाच दिवसांचा भरगच्च कार्यक्रम
पहिल्या दिवशी गणेश जयंतीनिमित्त भव्य महाआरती असेल. तर दुसऱ्या दिवशी बालकांसाठी कार्यक्रम आणि महिलांचे सांस्कृतिक उपक्रम, तिसऱ्या दिवशी श्री सत्यनारायण महापूजा आणि भाविकांसाठी महाभंडारा असेल तर चौथ्या दिवशी सकाळी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि संध्याकाळी महिलांसाठी हळदी-कुंकू सोहळा आयोजित केला आहे. पाचव्या दिवशी संध्याकाळी ६ वाजता विसर्जन मिरवणूक असेल. यंदा तरुणाईला आकर्षित करण्यासाठी रील्स, व्हिडिओ आणि फोटोग्राफी स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! पहिली ते नववीची अंतिम सत्र परीक्षा २० एप्रिलपासून; शिक्षक-विद्यार्थ्यांना ४४ दिवसांची उन्हाळा सुट्टी; १५ जूनपासून सुरु होणार शाळा

Weekend Special Recipe: नवीन काहीतरी खायचंय? मग वीकेंडला बनवा चविष्ट मुगदाळीची बाटी, सोपी आहे रेसिपी

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ७ मार्च २०२६ ते १३ मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT