कचरा टाकणाऱ्यांवर, अतिक्रमणांवर आता ‘एआय’ची नजर
परेलमध्ये उभारणार मुंबईचे स्वतंत्र डेटा सेंटर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : मुंबई शहराला अधिक स्मार्ट, सुरक्षित आणि प्रतिसादात्मक बनवण्यासाठी मुंबई महापालिकेने ‘मुंबई सिटी सर्व्हिलन्स’ (एमसीएस) प्रकल्पांतर्गत एक मोठे पाऊल उचलले आहे. मानवी निरीक्षणाच्या मर्यादा ओलांडून आता कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने शहरावर २४ तास नजर ठेवली जाणार आहे.
शहरात सध्या कार्यरत असलेल्या ५०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये आणि नव्याने प्रस्तावित ६५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये आता अत्याधुनिक व्हिडिओ ॲनेलिटिक्स प्रणाली बसवण्यात येणार आहे. त्यामुळे केवळ गुन्हेगारीवरच नव्हे, तर नागरी समस्यांवरही तंत्रज्ञानाच्या आधारे लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.
पदपथांवरील अडथळे आणि वाढत्या अतिक्रमणांची माहिती तत्काळ प्रशासनाला मिळेल. पावसाळ्यात पाणी साचण्याच्या ठिकाणांवर लक्ष ठेवून आपत्कालीन यंत्रणा लवकर कार्यान्वित करता येईल.
प्रणालीची विश्वासार्हता आणि सुरक्षितता जपण्यासाठी परेल येथील ‘सिटी इन्स्टिट्युट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट’मध्ये एक स्वतंत्र डेटा सेंटर आणि डिझास्टर रिकव्हरी केंद्र उभारले जाणार आहे. ही अत्याधुनिक पायाभूत सुविधा माहितीची सुरक्षितता सुनिश्चित करेल, जेणेकरून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत निर्णय घेण्याची प्रक्रिया अखंडित सुरू राहील. या प्रकल्पामुळे मुंबईची सुरक्षा यंत्रणा केवळ माहिती गोळा करणारी न राहता, संकटांना जलद प्रतिसाद देणारी एक सक्षम यंत्रणा म्हणून समोर येणार आहे.
प्रभावी देखरेख
या नव्या यंत्रणेमुळे पालिकेची प्रतिसाद क्षमता वाढणार असून, विविध बाबींवर प्रभावी देखरेख ठेवली जाईल. बेकायदा बांधकाम करणे किंवा कचरा फेकणाऱ्यांची ओळख पटवणे सोपे होईल. कचराकुंड्या भरून वाहणे किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर लक्ष ठेवले जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.