पश्चिम रेल्वे मार्गावरून लवकरच काेकणात गाड्या
नायगाव-जूचंद्र कॉर्ड लाइनचा प्रस्ताव
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : पश्चिम रेल्वे आणि कोकण रेल्वे यांना जोडणाऱ्या नायगाव-जूचंद्र कॉर्ड लाइनचा प्रस्ताव असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने गुरुवारी दिली. हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास कोकणातील काही गाड्या पश्चिम रेल्वे मार्गावरून चालवणे शक्य होणार आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरांत राहणाऱ्या काेकणवासीयांसाठी वांद्रे टर्मिनसहून रेल्वे सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा हाेणार आहे.
पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक पंकज सिंह यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी आर्थिक वर्ष २०२५-२६मधील कामगिरीचा आढावा घेतला. सिंह म्हणाले, ‘नायगाव-जूचंद्र कॉर्ड लाइनमुळे पश्चिम, मध्य आणि कोकण रेल्वेचे जाळे सक्षम हाेईल. रत्नागिरी-दिवा पॅसेंजरसारख्या काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्याचाही पर्याय उपलब्ध होऊ शकतो.’
-----
१५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांत वाढ
एप्रिलपासून १५ डब्यांच्या लोकलच्या १७ अतिरिक्त फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. त्यामुळे सुमारे ४५ हजार प्रवाशांची अतिरिक्त वहनक्षमता उपलब्ध होणार आहे, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला. अंधेरी-वांद्रे मार्गावर दोन नवीन १५ डब्यांचे रेक समाविष्ट करण्यात येणार असून, त्यापैकी एक रेक आधीच सेवेत दाखल झाला आहे. दुसरा रेक एप्रिलअखेर किंवा मे महिन्यात दाखल होण्याची शक्यता आहे, अशी माहिती देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.