मुंबई

धोकादायक दरडींच्या ठिकाणी संरक्षक भिंती उभा राहणार

CD

धोकादायक दरडींच्या ठिकाणी संरक्षक भिंती उभ्या राहणार
म्हाडाकडून ९१ जागेवर दगडी भिंत बांधण्याचे काम सुरू; पावसाळ्यात शेकडो झोपडीधारकांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : पावसाळ्यात मुंबईत ठिकठिकाणी दरड कोसळून अपघात होण्याची भीती असल्याने शेकडो कुटुंबे जीव मुठीत धरून दिवस काढतात. त्यांना यंदा मोठा दिलासा मिळणार असून, मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात धोकादायक दरडी असलेल्या ठिकाणी पावसाळ्यात भूस्खलन होऊन अपघात घडू नये, यासाठी म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाकडून तब्बल ९१ ठिकाणी सुमारे नऊ मीटर उंचीच्या संरक्षक भिंती उभारल्या जात आहेत. त्यामुळे परिसरातील शेकडो झोपडीधारकांना असलेली दरडीची चिंता मिटणार आहे.
मुंबई शहरात वरळी, भायखळा, शिवडी, डोंगरी, मस्जिद बंदर, शीव, मलबार हिल परिसरात तर उपनगरात घाटकोपर, कुर्ला, चांदीवली, मुलुंड, मालाड, दिंडोशी, गोरेगाव, भांडुप या परिसरात डोंगराच्या ठिकाणी असलेल्या झोपड्यांना पावसाळ्यात दरडीचा धोका असतो. अनेकदा अतिवृष्टीमुळे दरड कोसळून जीवितहानी होते. त्या पार्श्वभूमीवर धोकादायक असलेल्या दरडीच्या ठिकाणांचा शोध घेऊन आणि आमदार-खासदारांनी सुचवलेल्या दरडीच्या ९१ ठिकाणी मजबूत दगडी संरक्षक भिंत उभारण्याचे काम म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळाने हाती घेतले आहे. ही कामे ३१ मे अखेर पूर्ण केली जाणार असल्याचे मंडळाचे मुख्य अधिकारी सतीश भारतीय यांनी सांगितले.

डोंगर भागाला मजबुती
धोकादायक दरडीच्या ठिकाणी असलेली झाडे काढून परिसर साफ केला जातो. तसेच कमकुवत झालेला दरडीचा भाग काढून घेतला जातो. त्यानंतर खोल पाया काढून सुमारे दोन-अडीच मीटर रुंदीची दगडी भिंत उभारून परिसरातील झोपड्यांना संरक्षित केले जाते. तसेच काही ठिकाणी गरजेनुसार रॉक बोलटींग करूनही डोंगर भागाला मजबुती दिली जाते.

या ठिकाणी काम सुरू
वरळी, भायखळा, शिवडी, डोंगरी, मस्जिद बंदर, शीव, मलबार हिल परिसरात तर उपनगरात घाटकोपर, कुर्ला, चांदीवली, मुलुंड, मालाड, दिंडोशी, गोरेगाव, पश्चिम द्रुतगती मार्ग, भांडुप दरडग्रस्त परिसर असून, तेथे संरक्षक भिंतीचे काम सुरू आहे. मुंबई शहर-३० ठिकाणी, पूर्व उपनगर-५२ ठिकाणी आणि पश्चिम उपनगरात १४ ठिकाणी काम सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Banerjee Attack : अभिषेक बॅनर्जींवर जीवघेणा हल्ला; विटा-दगडं फेकत डोळे आणि छातीवर वार, ममता बॅनर्जींचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाल्या, सत्ताधारी खुनी...

Pune News: हिंजवडीतील IT कंपनी अचानक बंद? पगार नाही, चेक बाऊन्स... ७०० इंटर्न आणि कर्मचाऱ्यांचा वेतन घोटाळा उघड

Hero New Bike : पेट्रोल पंपावर जायचं विसरा! लॉन्च झाली Hero ची दमदार बाइक; 72km मायलेजसह जबरदस्त स्मार्ट फीचर्स, किंमत फक्त...

Gokul Politics : बंटी पाटलांना टक्कर देण्यासाठी महायुतीचा 'मास्टरस्ट्रोक'! 'गोकुळ'साठी कोरेंची मध्यस्थी अन् चंद्रकांतदादांनी काढला तोडगा, गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?

Akola RSS Office Attack Case: आरएसएस कार्यालय हल्ला प्रकरणात आमदार साजिद खान पठाण यांच्यासह १२ जणांची १६ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT