‘सकाळ’चे बातमीदार लोकलमध्ये १५ तास बेशुद्ध
रेल्वे प्रशासन, पोलिसांच्या दुर्लक्षाबाबत नाराजी
मुंबई, ता. २२ : मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये ‘सकाळ’चे बातमीदार संजय शिंदे तब्बल १५ तास बेशुद्धावस्थेत पडले होते. याबाबत रेल्वे प्रशासन आणि पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याबाबत ‘लोकांचे दोस्त’ संघटनेने मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे निवेदन दिले.
संजय नागनाथ शिंदे (६०) हे नुकतेच धारावी येथे वार्तांकनासाठी गेले होते. दुपारी शीव स्थानकावर पोहोचल्यानंतर त्यांचा कुटुंबीयांशी संपर्क तुटला. बराच वेळ त्यांच्या मोबाइलवरून प्रतिसाद मिळत नसल्याने धारावी पोलिस ठाण्यात बेपत्ता तक्रार नोंदवण्यात आली. दुसऱ्या दिवशी सकाळी रेल्वे पोलिसांनी शिंदे हे कल्याण स्थानकात असल्याची माहिती दिली. ते यार्डातून आलेल्या लोकलमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळले. प्रवाशांच्या माहितीवरून त्यांना कल्याण येथे उतरवून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना होली क्रॉस रुग्णालयात हलवण्यात आले. शिंदे यांच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळल्याचा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला आहे. त्यांच्यावरील उपचाराच्या खर्चाची भरपाई मिळावी तसेच अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.