मुंबई

चार वर्षांत खड्डे दुरुस्तीवर कोट्यवधींची उधळण

CD

चार वर्षांत खड्डे दुरुस्तीवर कोट्यवधींची उधळण
काँक्रीट रस्ते असूनही १५० कोटींची निविदा वादात
मुंबई, ता. २६ : मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी महापालिकेकडून वारंवार केल्या जाणाऱ्या कोट्यवधींच्या खर्चावर आता सामाजिक संस्थांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. महापालिकेने नुकतीच खड्डे दुरुस्तीसाठी १५० कोटी रुपयांची नवीन निविदा काढली असून, हा करदात्यांच्या पैशांचा अपव्यय असल्याचे ‘वॉचडॉग फाउंडेशन’ने म्हटले आहे. यासंदर्भात संस्थेचे विश्वस्त ॲड. गॉडफ्रे पिमेंटा आणि निकोलस अल्मेडा यांनी महापालिका आयुक्त, मुख्यमंत्री आणि ‘कॅग’ला पत्र पाठवून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
गेल्या चार वर्षांतील खड्डे दुरुस्तीच्या खर्चाचा आलेख पाहिला असता, महापालिकेने या कामावर कोट्यवधींची उधळण केल्याचे स्पष्ट होत आहे. २०२१-२२ आणि २०२२-२३ मध्ये साधारण १५० ते २०० कोटींची तरतूद होती. मात्र, २०२३-२४ मध्ये हा खर्च थेट २७५ ते ४०० कोटींच्या घरात पोहोचला, जो आतापर्यंतचा सर्वाधिक खर्च ठरला आहे. चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्येही पुन्हा १५४ ते २०० कोटी रुपये याच कामासाठी प्रस्तावित करण्यात आले आहेत.

काँक्रीटीकरणानंतरही खर्च कशासाठी?
मुंबईत एकूण २,०५० किमी रस्त्यांपैकी १,३३३ किमी रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले असून, उर्वरित ७०० किमीचे काम प्रगतिपथावर आहे. जर बहुतांश रस्ते सिमेंटचे झाले आहेत, तर खड्डे भरण्यासाठी पुन्हा १५० कोटींची गरज कशासाठी, असा सवाल वॉचडॉग फाउंडेशनने उपस्थित केला आहे. सिमेंटचे रस्ते खड्डेमुक्त होण्याचे दावे केले जात असताना निविदांचा पाऊस सुरूच असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

​उच्चस्तरीय चौकशीची मागणी
रस्त्यांच्या कामात पारदर्शकता असावी आणि जनतेचा पैसा जबाबदारीने खर्च व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे. ॲड. व्हिव्हियन डिसोझा आणि रिटा डिसा यांनी प्रशासनाने यावर तातडीने स्पष्टीकरण द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

​खड्डे दुरुस्तीची तरतूद
- २०२१-२२ : १५० ते २०० कोटी रुपये
- ​२०२२-२३ : १५० ते २०० कोटी रुपये
​- २०२३-२४ : २७५ ते ४०० कोटी रुपये
​- २०२४-२५ : १५४ ते २०० कोटी रुपये

बहुतांश रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाले असताना पुन्हा १५० कोटींच्या निविदा कशासाठी? हा निव्वळ करदात्यांच्या पैशांचा अपव्यय असून, एक पद्धतशीर घोटाळा आहे. आम्ही याची तक्रार ‘कॅग’कडे केली आहे.
- ॲड. गॉडफ्रे पिमेंटा,
विश्वस्त, वॉचडॉग फाउंडेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 PlayOff Scenario: सहा संघांनी खेळले ८ सामने, ४ संघांनी ७! प्ले ऑफच्या जवळ कोण अन् दूर कोण? पाहा Point Table ची स्थिती

IPL 2026 Point Table: सुनील नरीनने ३ चेंडूंत Super Over ची मॅच संपवली; कोलकाता नाइट रायडर्सचा रोमहर्षक विजय, LSG चे पॅकअप?

IPL 2026 News: MS Dhoni च्या चाहत्यांना झटका देणारी बातमी, CSK च्या वाढल्या अडचणी; सराव सत्रात जे घडलं, ते खूपच धक्कादायक...

Shirur Road Delivery Case: शिरूरमध्ये रस्त्यावर प्रसूतीची धक्कादायक घटना; आरोग्य विभागावर नाकर्तेपणाचे आरोप

Gangapur Shadval Baba Urus: अमळनेर वस्तीतील शादवल बाबांचा उरूस उद्या; हिंदू-मुस्लिम एकतेच्या प्रतीक उत्सवात सर्वधर्मीयांचा सहभाग

SCROLL FOR NEXT