मुंबई

नऊ मीटर रस्त्याच्या अटीमुळे रखडलेला पुनर्विकास होणार

CD

नऊ मीटर रस्त्याच्या अटीमुळे
रखडलेला पुनर्विकास होणार
मुंबई, ता. २६ : मुंबईतील नऊ मीटरपेक्षा कमी रुंदीचा प्रवेशमार्ग असलेल्या भूखंडावरील गृहनिर्माण सोसायट्यांच्या रखडलेल्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे. यासाठी दरेकर अभ्यास गटाने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी होत आहे. महापालिकेने या शिफारशींनुसार विकास नियंत्रण नियमावली २०३४मध्ये तिचा समावेश करण्याचा प्रस्ताव शासनाला दिला आहे. यामुळे अनेक गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासाबाबत दिलासा मिळेल.

दरेकर यांनी सांगितले, की नऊ मीटरपेक्षा कमी रुंदी असलेल्या रस्त्यावरील इमारतींबाबत सध्या देय असलेल्या ०.२ एफएसआयऐवजी विनामूल्य ०.४ एफएसआय देण्यात यावा, अशा प्रकारचा निर्णय २०१९मध्ये शासनाने घेतला होता. डीसीपीआर २०३४मध्ये याबाबतची कोणतीही तरतूद नसल्याने तो लागू होत नव्हता.

२०१८ला बृहन्मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४ अमलात आली आणि त्यात रस्त्याच्या रुंदीप्रमाणे एफएसआय निश्चित करण्यात आला. त्यामुळे जे भूखंड नऊ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यालगत आहेत त्यांना टीडीआर व अतिरिक्त शासकीय एफएसआय वापरण्याची संधीच नसल्यामुळे या जुन्या इमारती पुनर्विकासापासून वंचित झाल्या. दरेकर अभ्यास गटाने नऊ मीटरपेक्षा कमी रुंदी असलेल्या रस्त्यालगतच्या इमारतींना नऊ मीटरसाठी लागू असलेला टीडीआर व शासकीय एफएसआय (इमारतीची उंची ३२ मीटरपर्यंत मर्यादित ठेऊन) उपलब्ध करावा आणि तशी दुरुस्ती बृहन्मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत करावी, अशी शिफारस केली होती. शासनाने दरेकर अभ्यास गटाचा अहवाल स्वीकारल्याने नगरविकास विभागाने डीसीपीआरमध्ये दुरुस्ती केल्यावर पुनर्विकास सुरू होईल, असे दरेकर यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 PlayOff Scenario: सहा संघांनी खेळले ८ सामने, ४ संघांनी ७! प्ले ऑफच्या जवळ कोण अन् दूर कोण? पाहा Point Table ची स्थिती

IPL 2026 Point Table: सुनील नरीनने ३ चेंडूंत Super Over ची मॅच संपवली; कोलकाता नाइट रायडर्सचा रोमहर्षक विजय, LSG चे पॅकअप?

IPL 2026 News: MS Dhoni च्या चाहत्यांना झटका देणारी बातमी, CSK च्या वाढल्या अडचणी; सराव सत्रात जे घडलं, ते खूपच धक्कादायक...

Shirur Road Delivery Case: शिरूरमध्ये रस्त्यावर प्रसूतीची धक्कादायक घटना; आरोग्य विभागावर नाकर्तेपणाचे आरोप

Gangapur Shadval Baba Urus: अमळनेर वस्तीतील शादवल बाबांचा उरूस उद्या; हिंदू-मुस्लिम एकतेच्या प्रतीक उत्सवात सर्वधर्मीयांचा सहभाग

SCROLL FOR NEXT