मुंबई

मैदानात धुमश्चक्री! प्रिमिअर ताडवागळेने मोडले जेएसडब्ल्यूचे वर्चस्व; पोर्ट ट्रस्ट आणि शिवशक्तीही अजिंक्य

CD

प्रीमियर ताडवागळेला जेतेपद
जेएसडब्ल्यूवर दमदार विजय

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २६ : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धेचा अंतिम थरार शनिवारी दादर येथे (कामगार क्रीडा भवन) रंगला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या लढतीत अलिबागच्या प्रीमियर ताडवागळे संघाने बलाढ्य जेएसडब्ल्यू डोलवीचा विजयरथ रोखत ग्रामीण गटाचे जेतेपद पटकावले. दुसरीकडे शहरी गटात मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि महिलांमध्ये शिवशक्ती संघाने आपले वर्चस्व सिद्ध केले.

​पुरुष ग्रामीण गटाचा अंतिम सामना श्वास रोखून धरायला लावणारा ठरला. सलग पाच वेळा चॅम्पियन राहिलेल्या जेएसडब्ल्यू डोलवीने पहिल्या डावात १८-१४ अशी आघाडी घेतली. सामन्याच्या शेवटच्या ३० सेकंदांत जेएसडब्ल्यूकडे दोन गुणांची निसटती आघाडी होती. त्यांचा एकमेव खेळाडू ऋतिक पाटील मैदानात होता. मात्र प्रीमियरच्या बचावफळीने त्याला जागीच ‘गार’ केले आणि ऑलआऊटचे तीन गुण वसूल करीत ३९-४० अशा अवघ्या एका गुणाने ऐतिहासिक विजय मिळवला. मिथुन मोकस आणि रोशन मढवी यांनी चढाईत, तर प्रणीत रहाटे आणि अजय मोरे यांनी पकडीत कमाल केली.

​पुरुष शहरी गटात मुंबई पोर्ट ट्रस्ट विरुद्ध न्यू इंडिया इन्शुरन्स यांच्यात ‘काँटे की टक्कर’ झाली. मध्यांतरापर्यंत ११-१७ ने पिछाडीवर असलेल्या पोर्ट ट्रस्टने दुसऱ्या डावात १७-०८ असे जोरदार पुनरागमन केले. प्रतीक जाधवची चढाई आणि तेजस टक्केच्या अचूक पकडीमुळे पोर्ट ट्रस्टने २८-२५ अशा फरकाने बाजी मारली. ​महिलांच्या खुल्या गटात मात्र शिवशक्ती संघाने एकतर्फी वर्चस्व गाजवले. रुबी कन्स्ट्रक्शनविरुद्ध खेळताना शिवशक्तीने ४२-२७ असा दणदणीत विजय मिळवला. सोनाली शिंगटे आणि रुणाली भुवड यांच्या तुफानी चढायांपुढे प्रतिस्पर्धी संघ निष्प्रभ ठरला.

या २९व्या औद्योगिक आणि २४व्या महिला स्पर्धेत राज्यातील १०२ संघ उतरले होते. अर्जुन पुरस्कार विजेते माया आक्रे आणि अशोक शिंदे, कल्याण आयुक्त भास्कर मोरडे यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने पार पडलेल्या या स्पर्धेचे सूत्रसंचालन विनय थळे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 PlayOff Scenario: सहा संघांनी खेळले ८ सामने, ४ संघांनी ७! प्ले ऑफच्या जवळ कोण अन् दूर कोण? पाहा Point Table ची स्थिती

IPL 2026 Point Table: सुनील नरीनने ३ चेंडूंत Super Over ची मॅच संपवली; कोलकाता नाइट रायडर्सचा रोमहर्षक विजय, LSG चे पॅकअप?

IPL 2026 News: MS Dhoni च्या चाहत्यांना झटका देणारी बातमी, CSK च्या वाढल्या अडचणी; सराव सत्रात जे घडलं, ते खूपच धक्कादायक...

Shirur Road Delivery Case: शिरूरमध्ये रस्त्यावर प्रसूतीची धक्कादायक घटना; आरोग्य विभागावर नाकर्तेपणाचे आरोप

Gangapur Shadval Baba Urus: अमळनेर वस्तीतील शादवल बाबांचा उरूस उद्या; हिंदू-मुस्लिम एकतेच्या प्रतीक उत्सवात सर्वधर्मीयांचा सहभाग

SCROLL FOR NEXT