मुंबई

Fishing Crime: निर्बंध असतांनाही करत होते मासेमारी; मुरूडच्या तटरक्षक दलाकडून बोटी जप्त

CD

Murud News: एलईडी, पर्सनेट मासेमारीवर निर्बंध असतानाही अलिबाग कोळीवाड्यातील काही मच्छीमार खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या चार बोटींवर भारतीय तटरक्षक विभागाच्या मुरूड विभागाने कारवाई केली.

या कारवाईत ३७ खलाशांना पकडण्यात आले असून एका १२ वर्षांच्या बालकामगाराचाही समावेश आहे. विशेष म्हणजे आठवडाभरात बेकायदा मासेमारीविरोधात ही दुसरी कारवाई आहे.

भारतीय तटरक्षक दलाच्या जवान दैनंदिन टेहळणी करताना खोल समुद्रात बुधवारी (ता. २७) पहाटे एलईडीद्वारे चार बोटी मच्छीमारी करत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तटरक्षक दलाच्या जवानांनी एका बोटीला घेराव घातल्यानंतर अन्य बोटी पळू लागल्या होत्या.

या वेळी जवानांनी पाठलाग करून अलिबाग कोळीवाड्यातील बल्लाळेश्वर, सिद्धिविनायक, कुलस्वामिनी अशा सहा सिलिंडरच्या चार बोटी पकडल्या.

या बोटींवरील पकडलेले सर्व मच्छीमार उत्तर प्रदेशातील सुलतान पुरीचे रहिवासी आहेत. त्याच्याकडून एक टनापेक्षा अधिक मासळी २२ एलईडी, तीन जनरेटर असा ३० लाखांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.


भारतीय तटरक्षक दलाकडे अत्याधुनिक यंत्रणा असल्याने खोल समुद्रात बेकायदा मच्छीमारी करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.
- संजय पाटील, मत्स्य विभाग आयुक्त, अलिबाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT