मुंबई

भारतात जगातील सर्वात मोठी लोकशाही

CD

पालघर, ता. २८ (बातमीदार) : स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही चतुःसूत्री भारतीय संविधानामध्ये समाविष्ट केल्यामुळे आज भारत हा जगातील सर्वात मोठा यशस्वी लोकशाही अंमलात आणणारा देश ठरला असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी गोंविद बोडके यांनी व्यक्त केला. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ, पोलिस परेड मैदान, येथे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, आमदार श्रीनिवास वनगा, पालघर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा उज्ज्वला काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, संदीप पवार, प्रांताधिकारी धनाजी तोरस्कर, तसेच जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी, पत्रकार, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.
पालघर जिल्ह्याची ओळख साहित्यिक, सांस्कृतिक आणि स्वातंत्र्य संग्रामात अनमोल असे योगदान दिलेला जिल्हा म्हणून कायम राहिली आहे. आदिवासी संस्कृतीची ओळख असलेली वारली चित्रकला ही जगभरात पोहचवणारे पद्मश्री स्वर्गीय जिव्या सोम्या म्हसे यांनी आदिवासी बांधवांच्या जीवनातील स्थित्यंतरे जगभरात पोहोचवून आदिवासी संस्कृतीचा सन्मानच केला असल्याचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

IPL 2024 DC vs RR Live Score: अक्षर पटेलने राजस्थानला दिला दुसरा धक्का! दोन्ही सलामीवीर परतले माघारी

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

SCROLL FOR NEXT