मुंबई

वरळीच्या एसटीपी प्रकल्पाचा फटका १२५० झाडांना?

CD

मुंबई, ता. ३१ : मुंबईत काही दिवसांपूर्वी मलनिःसारण प्रक्रिया प्रकल्पाचे (एसटीपी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. त्यापैकी वरळीतील लव्हग्रुव्ह पम्पिंग स्टेशनच्या मागील बाजूला १,२५० झाडे कापण्याचा आणि पुनर्रोपण करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. या प्रस्तावित एसटीपीसाठी पालिका झाडे कापणार आहे. उद्यान विभागाने १,२५० झाडांबाबतची जाहीर सूचना काढली आहे. त्यानुसार नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत.

एसटीपी प्रकल्पासाठी १,२५० पैकी ५७३ झाडे कापण्यात येणार आहेत. ६७७ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येईल. या एसटीपी प्लांटच्या निमित्ताने संपूर्ण प्रकल्पात किमान झाडे कापली जातील, अशा अनुषंगाने प्रकल्पाची डिझाईन करण्यात यावी, अशा सूचना पालिकेकडून देण्यात आल्या होत्या. कमीत कमी झाडांवर परिणाम होऊन हा प्रकल्प राबविण्याचा पालिकेचा मानस आहे. प्रकल्पाअंतर्गत झाडे वाचवण्यासाठी किंवा पुनर्रोपण करण्यासाठी कोणताही प्रयत्न न केल्याने कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीसही २८ डिसेंबर २०२२ रोजी बजावण्यात आलेली आहे.

वरळी येथील प्रस्तावित एसटीपी प्लांट गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला प्रकल्प आहे. महापालिकेच्या एमएसडीपी प्रकल्पाअंतर्गत जवळपास सात कंत्राटदारांना या प्रकल्पाचे २६ हजार कोटी रुपयांचे काम देण्यात येणार आहे. मुंबईतील सात एसटीपी प्रकल्पाअंतर्गत वरळी, वांद्रे, कुलाबा, वर्सोवा, मालाड, घाटकोपर आणि भांडुप या ठिकाणाहून मलःनिसारण प्रक्रिया पार पडणार आहे. त्याअंतर्गत २,४६४ दशलक्ष लिटर पाण्यावर एसटीपी प्रकल्पाअंतर्गत प्रक्रिया होणार आहे. सध्याचा वरळीतील एसटीपी प्रकल्प २००६ पासून कार्यरत आहे. या ठिकाणी तीन दशलक्ष लिटर इतक्या मलनिःसारण पाण्यावर प्रतिदिन प्रक्रिया केली जाते.

प्रकल्पामुळे कांदळवनांना नुकसान नाही
वरळीच्या लवग्रुव्ह पम्पिंग स्टेशनच्या मागील बाजूला हा एसटीपी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत कोणत्याही कांदळवनाचे नुकसान होणार नाही. केवळ लहान आणि मोठ्या झाडांची कत्तल होणार आहे. एका रहिवासी भागाच्या नजीकच या झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

T20 World Cup 2024: 'हार्दिकच्या जागेसाठी मोठी चर्चा, तर सॅमसन...', टीम इंडिया निवडीवेळी काय झालं, अपडेट आली समोर

LSG vs MI IPL 2024 Live : नेहलची झुंजार खेळी, टीम डेव्हिडची हाणामारी; मुंबईनं लखनौसमोर ठेवलं 145 धावांचे आव्हान

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

SCROLL FOR NEXT