मुंबई

जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजपचे आंदोलन

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ ः पुण्यात पार पडलेल्या एका कार्यक्रमामध्ये आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारे वक्तव्य केल्याचा आरोप करत ठाण्यात भाजप युवा मोर्चाने रविवारी (ता. ५) निदर्शने केली. या वेळी आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. तसेच आव्हाड यांनी तत्काळ माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली.

महाराष्ट्र सन्मान परिषद आयोजित ‘आवाज बहुजनांचा, सन्मान महाराष्ट्राचा’ हा कार्यक्रम पुणे येथे झाला. या वेळी भाषण करताना आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास नष्ट करण्याचे षडयंत्र सुरू असल्याचे सांगितले. हे दाखले देत असताना शासकीय अभ्यासक्रमातून मुगलांचा विषय वगळण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जर मुगलांना अभ्यासक्रमातून वगळले तर छत्रपतींच्या शौर्याचा इतिहासच नष्ट होईल, असे आव्हाड म्हणाले. त्यावरून भाजपने आव्हाड हे औरंगजेब आणि शाहिस्तेखानची तळी उचलत असून त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान झाला असल्याचा आरोप केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी या विषयात त्वरित माफी मागावी, अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सारंग मेढेकर यांनी केली.
--
आव्हाडांचे ट्विटवरून उत्तर
आपल्या वक्तव्यावरून वाद निर्माण केला जात असल्याचे लक्षात येताच आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून विरोधकांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा. दुर्योधन, कर्ण काढून महाभारतातून कृष्ण समजावून सांगा. आदिलशाही आणि मुगल बाजूला काढून छत्रपतींचा इतिहास समजवून सांगा, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; सूत्रांची माहिती

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी अमित शहा आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT