मुंबई

माता रमाई जयंतीनिमित्त बाईक रॅली

CD

चेंबूर, ता. ९ (बातमीदार) ः माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आंबेडकरी युवकांच्या वतीने अभिवादन बाईक रॅली काढण्यात आली. मुंबई उपनगरांतील आंबेडकरी वसाहतींमध्ये माता रमाई आंबेडकर यांची जयती सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. चेंबूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळील बुद्ध विहारापासून बाईक रॅली सुरू होऊन सिद्धार्थ कॉलनी, लाल डोंगर वडाळा, दादर, वरळी मार्गे वरळी येथील माता रमाई आंबेडकर स्मारकाला अभिवादन करून या रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये मुंबई उपनगरांतील आंबेडकर अनुयायांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतला होता. विकी शिंगारे, विशाल गायकवाड, संदीप जाधव, प्रदीप अंढागळे, जया बनसोडे, सुरेश येडे, प्रदीप लिहनार, भारत भद्रगे अन्य कार्यकर्ते आयोजकांनी यांनी रॅली यशस्वी करण्याकरता मेहनत घेतली.

निराधार देवदासी महिला संघटनेचे पदाधिकारी जाहीर
घाटकोपर, ता. ९ (बातमीदार) ः महाराष्ट्र निराधार देवदासी महिला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विलास रुपवते यांनी संघटनावाढीच्या दृष्टीने नवीन पदनियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या नव्या नियुक्त्यांमध्ये महाराष्ट्र प्रमुख सल्लागार माजी आमदार बाळासाहेब दांगट, महाराष्ट्र राज्य कार्य अध्यक्ष महेश राणे, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस सारिका शिंदे, महाराष्ट्र राज्य प्रवक्ता महामंडलेवेश्वर शिव लक्ष्मी झाल्टे, महाराष्ट्र राज्य संघटक मिरा उन्हाळे, महाराष्ट्र राज्य सचिव सागर कांबळे, उत्तर महाराष्ट्र संघटक शशी सोनार, महाराष्ट्र राज्य सचिव चंद्रकांत ऐडके, महाराष्ट्र राज्य सचिव किशोर रोकडे, महाराष्ट्र राज्य उपसंघटक सुनिता भोसले आदी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने २००५ मध्ये सामाजिक कार्यकर्ते विलास रुपवते आणि दिवंगत लता सकट यांनी महाराष्ट्र निराधार देवदासी महिला संघटनेची स्थापना केली.

चांदिवलीत महाआरोग्य शिबिर
घाटकोपर, ता. ९ (बातमीदार) ः बाळासाहेबांची शिवसेना चांदिवली विधानसभा आमदार दिलीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना चांदिवली विधानसभा मतदारसंघातर्फे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाआरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात मोफत डोळे तपासणी, चष्मावाटप, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मोफत ईसीजी तपासणी करण्यात आली. शिबिरात युवकांनी पुढाकार घेत रक्तदान मोठ्या संख्येने केले. या शिबिराचे उद्घाटन आमदार दिलीप लांडे यांच्या उपस्थितीत जेष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

‘इच वन टीच वन’चे स्‍नेह संमेलन
कांदिवली, ता. ९ (बातमीदार) ः ‘इच वन टीच वन’ चॅरिटेबल फाऊंडेशन या शैक्षणिक संस्थेला चार दशके पूर्ण झाल्याने वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन केले होते. ब्रिच कँडी येथील सोफिया भाभा सभागृह येथे नुकताच हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या लेखिका रश्मी बंसल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. ‘मुलांना शिक्षित करा आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व घडवा’ हे या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे. संस्थेच्या संस्थापक व अध्यक्षा ज्योती तन्ना यांनी पाच शाळाबाह्य गरीब व होतकरू मुलांसाठी सुरू केलेल्या संस्थेचे आज पंचवीस हजारापेक्षा जास्त लाभार्थी विद्यार्थी आहेत. ही संस्था मुंबई, नवी मुंबई, पालघर, रायगड, दिल्ली, बेंगलोर या ठिकाणच्या विविध गरजू शाळांमध्ये आपला उपक्रम निःशुल्करीत्या राबवित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KL Rahul: 'हा काय वनडे-टी20 खेळणार, त्याच्याकडे स्ट्रेंथच नाही...', केएल राहुलने सांगितली ती आठवण

Gargai Dam Project : गारगाई प्रकल्पाला येणार वेग; मुंबईला मिळणार ४०० दशलक्ष लिटर पाणी

PSL vs IPL : पाकिस्तान करणार धरमशालाची कॉपी; PSL ला IPL सारखी झळाळी देण्यासाठी सुरू केली धडपड

SRH vs LSG Live Score : तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

जेपी नड्डा, अमित मालवीय यांना 'आक्षेपार्ह पोस्ट' प्रकरणी पोलिसांचे समन्स, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT