मुंबई

माझे बोहरांशी जुने नाते ः मोदी

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १० : मुंबईतील अलजामी तुस सैफियाह (सैफी अकादमी)च्या नव्या कॅम्पसचे उद्‍घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. मी अतिशय भाग्यवान आहे. या परिवारासोबत माझ्या गेल्या चार पिढ्या जोडल्या गेल्याचा मला आनंद आहे, अशी भावना या वेळी मोदी यांनी व्यक्त केली. याप्रसंगी पंतप्रधानांनी संपूर्ण अकादमीचा फेरफटका मारला. या अकादमीकडून बोहरा समुदायाच्या परंपरा आणि साक्षरता, संस्कृती याविषयी शिक्षण दिले जाते.

या वेळी नरेंद्र मोदी म्हणाले, ‘‘माझे आणि बोहरा समाजाचे नाते जुने आहे. ते लपलेले नाही. एखादा समाज काळानुरूप आपली प्रासंगिकता किती कायम ठेवतो यावरून त्या समाजाची ओळख होत असते. बोहरा समाजाने काळानुरूप बदल स्वीकारतानाच विकासाच्या कसोटीवर स्वतःला सिद्ध केले आहे.’’

बोहरा समाजाचे धर्मगुरू सैयदना यांच्याविषयी बोलताना मोदी म्हणाले, वयाच्या ९८ व्या वर्षी सैयदना हे आठशेहून अधिक विद्यार्थ्यांना शिकवतात ही बाब मला आजही प्रेरणा देते. अनेकदा परदेशात गेल्यावर कडाक्याच्या थंडीतही या समाजाचे लोक मला आवर्जून भेटायला येतात. भारतासाठी चिंता आणि प्रेम त्यांच्या बोलण्यातून नेहमीच व्यक्त होत असते.

भारत हे एकेकाळी नालंदा आणि तक्षशिला यांसारख्या विश्व विद्यालयांचे केंद्र होते. जगभरातून याठिकाणी लोक शिक्षणासाठी येत असत. आपल्याला भारताच्या वैभवशाली परंपरेला कायम ठेवण्यासाठी शिक्षणाच्या क्षेत्रातही अशा पद्धतीचा गौरव पुन्हा मिळवण्याचे आव्हान आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT