मुंबई

चॉकलेट, केक, फुलांचा गुच्छ

CD

चैताली वर्तक, ठाणे
प्रेमाचा संदेश देणारे शुभेच्छा पत्र, हार्ट शेपचे चॉकलेट, केकही हार्ट शेपचा, लाल गुलांबानाही हृदयाचा आकार अन् सोबत एखादी भेटवस्तू... ‘व्हॅलेंटाईन डे’साठी तरुणाईचा बेत पक्का झाला असून, त्यासाठी दुकाने, बाजार, मॉल सज्ज झाले आहेत.
आपल्या आयुष्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा अशा भावना नसतील तर कोणत्याही नात्याला काहीच अर्थ राहत नाही. प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही खास दिवसाची गरज नसते. प्रेम आपण कधीही व्यक्त करू शकतो. पण तरीही १४ फेब्रुवारी हा खास दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणजेच प्रेम दिवस म्हणून साजरा करण्याचे फॅड वाढू लागले आहे. गेल्या काही वर्षात या दिवसाला अगदी सणासारखे स्वरूप येत चालले आहे. आपल्या ‘व्हॅलेंटाईन’ला भेट वस्तू किंवा ग्रीटिंग, गुलाब देऊन प्रेम व्यक्त केले जाते. ही आठवण गोड व्हावी यासाठी खास चॉकलेट देऊन किंवा केकही कापून सेलिब्रेशन केले जाते. तरुणाईचे हे ‘वेड’ कॅश करण्यासाठी बाजारपेठाही सज्ज होतात. सध्या ठाण्याच्या बाजारपेठेत विविध आकाराची ग्रीटिंग कार्ड, टेडीबेयर, हार्ट शेपची उशी, अशा वस्‍तूंना मागणी आहे. गुलाबाचा हार्ट शेपचा गुच्छ देखील ऑर्डरप्रमाणे बनवून मिळत आहे. गुलाब व चॉकलेट लावलेले गुच्छ अधिक प्रमाणात विकले जात आहे.

हॉटेल, कॅफेमध्ये खास सजावट
हॉटेल, कॅफे येथे खास ‘व्हॅलेंटाईन डे’साठी सजावट देखील करण्यात आली आहे. प्रेमी युगुलासाठी ऑफर देखील ठेवण्यात आल्या आहेत. कॅफेमध्ये कपलसाठी हार्ट शेप असलेली कॉफी, केक, चॉकलेट बनवण्यात आले आहेत. ‘व्हॅलेंटाईन डे’ला लग्न करण्याचे प्रमाण ही जास्त असते, त्यामुळे सध्या बाजारात दुल्हन किट सुद्धा उपलब्ध आहे .

ग्रीटींगला मागणी
सध्या ऑनलाईनचा जमाना आहे. समाजमाध्यमातून शुभेच्छा देण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे काळाच्या ओघात शुभेच्छा संदेश देणारे ग्रीटींग कार्ड मागे पडले. पण ‘व्हॅलेंटाईन डे’ला भेटवस्तूसोबत प्रेम संदेश देणारे ग्रीटींग आवर्जून दिले जाते. म्हणून इतर दिवसांच्या तुलनेत या दिवशी ग्रीटींग कार्डला मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. हार्ट शेप, चौकोनी आकार, फोल्डिंग ग्रीटिंग व त्यावर प्रेमाविषयीचा छानसा संदेश, कुठे गुलाबाची प्रिंट असलेले ग्रीटिंग तर हार्टमध्ये नाव टाकून मिळणारे ग्रीटिंग अशा अनेक प्रकारच्या ग्रीटिंगने दुकाने सजली आहेत. दुसरीकडे फुल बाजारात गुलाबाचे बुके बनवणे त्यातही हार्ट आकाराचे बुके, लाल गुलाबाचे चॉकलेटने सजवलेले बुके ऑर्डर प्रमाणे मिळत आहेत.


ङ ग्रीटिंग कार्ड
- छोटे अगदी १०० पासून ते ५०० व त्याहून ही फोटो असलेले कार्ड महाग
ङ टेडीबेयर
- छोटा १५० , २०० ते पुढे ५०० ,१०००
ङ गुलाब
- छोटा ६ - ७ फुलांचा साधा गुच्छ ८०ते १००
- मोठा हार्ड शेप ३०० पासून पुढे
- साधा २०० पासून पुढे आकार व फुलांच्या भाव प्रमाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT