मुंबई

न्यायालयीन प्रकरणांचा जलद निवाडा

CD

नवी मुंबई, ता. १३ (वार्ताहर): सीबीडी बेलापूर न्यायालयात शनिवारी झालेल्या लोक अदालतीमध्ये ३१३२ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. या सर्व प्रकरणात तब्बल ११ कोटी ३० लाख २६ हजार रुपयांची तडजोड करण्यात आली असून ७५९ प्रकरणांमधील तडजोडीतून तब्बल ४.६० कोटींची वसुली करण्यातही यश आले आहे.
बेलापूर येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात सद्यस्थितीत सुमारे २१ हजार ९८० प्रकरणे प्रलंबित आहेत. शासनाच्या निर्देशानुसार न्यायालयात प्रलंबित असलेले खटले निकाली काढण्यासाठी शनिवारी बेलापूर येथील न्यायालयात लोक अदालत घेण्यात आली. यावेळी मुख्य न्यायाधीश अर्चना मुजूमदार यांच्या मार्गदर्शनाखालील १४ पॅनलसह ५८ कर्मचारी नेमण्यात आले होते. यावेळी दाखलपूर्व व दाखल असलेल्या एकूण १४ हजार ८६० प्रकरणे निकालांपैकी ३१३२ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यात २८० प्रकरणे दाखल होण्यापूर्वीच निकाली काढण्यात आली. या प्रकरणांमध्ये तब्बल ११ कोटी ३० लाख २६ हजार रुपयांची तडजोड करण्यात आली. तर सर्वाधिक जास्त ७५९ प्रकरणांमधील तडजोडीपोटीची तब्बल ४.६० कोटीची वसूल करण्यात आली आहे.
----------------------------------------------
या लोक अदालतीमध्ये नवी मुंबई महापालिकेची दाखलपूर्व प्रकरणे, शाळा न्यायाधिकारणाची प्रकरणे, ग्राहक मंचाची प्रकरणे, बँक आणि फायनान्स कंपन्याची प्रकरणे, एमएसईबी, एमटीएनएल तसेच वाहतूक विभागाची ई-चलानची प्रकरणे निकाली काढण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

IPL 2024 DC vs RR Live Score: दुसऱ्याच चेंडूवर राजस्थानला मोठा धक्का! जैस्वालला ४ धावांवरच झाला आऊट

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : जळगाव-पाचोरा रोडवर भीषण अपघातात; ३ शाळकरी मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT