मुंबई

बालविवाह प्रथा रोखण्यासाठी जनजागृती

CD

कासा, ता. १३ (बातमीदार) : तालुक्यातील गाव खेड्यात बालविवाह, कुमारी माता, अंधश्रद्धा, व्यसन या गोष्टी सर्रास सुरू असतात. या सर्वांना आळा बसवण्यासाठी पालघर जिल्ह्यातील पोलिस दलामार्फत वेगवेगळ्या मार्गाने जनजागृती केली जात आहे. बालविवाह प्रथा रोखण्यासाठी उपाययोजना व जनजागृती करण्यासाठी कासा पोलिस ठाणे हद्दीतील पोलिस पाटील, सरपंच, ब्राह्मण, समाज मंडळाचे अध्यक्ष, लग्नपत्रिका छपाई करणारे तसेच त्या ठिकाणच्या महिला सदस्य यांची बैठक कासा येथील बिरसा मुंडा सभागृहात आयोजित केली होती.
कासा पोलिस ठाण्याचे श्रीकांत शिंदे यांनी बालविवाह केल्यास होणारे दुष्परिणाम याविषयी माहिती दिली. बालविवाह करणारा व या बालविवाहास उपस्थित राहणाऱ्यांवरसुद्धा गुन्हा दाखल केला जातो. त्यामुळे आपण गावातील प्रमुख नागरिक असून अशा घटना घडू नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी पथनाट्य, स्पर्धा, चित्रफित, प्रचार रॅली काढून जनजागृती करण्याचे आवाहन केले. या सभेत सभेत सहायक पोलिस अधिकारी संदीप नागरे, संदीप गावंडा, एस. चौधरी तसेच अनेक गावातील सरपंच, पोलिस पाटील, महिला सदस्य, भटजी, पत्रिका छपाई करणारे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export Duty: लोकसभेच्या धामधुमीत मोदी सरकारचा मोठा निर्णय! कांद्यावर लावले 40 टक्के निर्यात शुल्क

Rohit Sharma : टी-20 वर्ल्ड कप 2024आधी कर्णधार रोहित शर्माला झाली दुखापत; मोठी अपडेट आली समोर

Viral Video : दहा मिनिटात फर्निचर डिलिव्हरी, तेही दुचाकीवर.. कसं शक्य आहे? आनंद महिंद्रानी शेअर केला व्हिडिओ

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

SCROLL FOR NEXT