मुंबई

चारोटी येथे दुचाकीवरील तिघांच्या मृत्यु मुळे प्रशासन जागे

CD

कासा, ता. १५ (बातमीदार) : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे मंगळवारी दुचाकीवरील ३ जणांना आपला जीव गमवावा लागला. या अपघाताला कारण ठरलेल्या क्रॉसिंगवर आज मातीचा भराव (डिव्हायडर टाकत) टाकून बंद करण्याच्या कामास सुरुवात झाली आहे.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी येथील एशियन पेट्रोल पंपासमोर एका भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत ३ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. यात तलासरी सूत्रकार येथील वडील, मुलगा आणि एक नातेवाईक अशा‍ तिघांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त करीत सेवारस्त्याचे काम अपूर्ण ठेवणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार कंपनी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. बुधवारी सकाळपासून महामार्ग ठेकेदार यांनी तेथील क्रॉसिंगवर मातीचा भराव करीत डिव्हायडरचे बांधकाम सुरू केले. यासाठी कासा पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी श्रीकांत शिंदे हे मोठा पोलिस बंदोबस्त ठेऊन होते. या कामाच्या पाहण्यासाठी डहाणू मतदारसंघाचे आमदार विनोद निकोले, डहाणू तहसीलदार अभिजीत देशमुख, तहसील कर्मचारी, तलाठी, महामार्ग ठेकेदार राम राठोड उपस्थित होते. या वेळी तहसीलदार अभिजीत देशमुख यांना स्थानिकांनी अपूर्ण सेवा रस्तादेखील पूर्ण करावा, अशी मागणी केली. याबाबत तहसीलदारांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यास फोन लावून सेवा रस्ता पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

----------

- महामार्ग प्राधिकरण अधिकारी आत्तर्दे यांना पाच दिवसांत हा अपूर्ण सेवा रस्ता पूर्ण करण्याचे सांगितले आहे. अपूर्ण कामामुळे अनेक जीव गेले आहेत. आता आणखी जीव जाता कामा नये. एशियन पंपाजवळील क्रॉसिंग बंद केली असून अशी अपघाती ठिकाणे असतील, तेथेसुद्धा या उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
- विनोद निकोले, आमदार, डहाणू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: "पंतप्रधान मोदी मंगळसूत्र आणि बांगड्यांबद्दल बोलतात, मात्र ऑलिम्पिकपटूंचा लैंगिक छळ होताना ते गप्प असतात," प्रियंकांचा हल्लाबोल

Latest Marathi News Live Update : बाणेर-पाषाण रोडवर ट्रॅफिक जाम.. वाहनांच्या रांगा

Accident News: मुंबई आग्रा चांदवड मार्गावर भीषण अपघात; ६ ते ७ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Rajesh Joshi : नागपूरचे राजेश जोशी आशिया बुकमध्ये; केली सर्वात छोट्या व हलक्या विमानाची निर्मिती

खासदार रेवण्णांची धजदमधून हकालपट्टी होणार?ऐन निवडणुकीत माजी पंतप्रधानांच्या नातवावर अटकेची टांगती तलवार

SCROLL FOR NEXT