मुंबई

रस्त्यावरील चेंबरचे झाकण तुटल्याने अपघाताची भीती

CD

मालाड, ता. २१ (बातमीदार) ः मार्वे रोडवर मालवणी क्रमांक एक येथे रस्त्यावर असलेले पाण्याच्या चेंबरचे लोखंडी झाकण खचल्याने अपघाताची भीती व्‍यक्‍त केली जात आहे. मार्वे रोडखालून जात असलेल्‍या जलवाहिनीला असलेले वोल्व्ह रस्‍त्‍याच्‍या मधोमध असून यासाठी असलेल्‍या चेंबरचे झाकण खचले आहे. पालिकेने हे झाकण त्‍वरित दुरुस्‍त करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मालवणी परिसरात पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी किमान दिवसातून चार वेळेस या ठिकाणी वोल्व्ह उघड बंद करण्यासाठी येत असतात. त्यामुळे हे तुटलेले झाकण त्यांच्या निदर्शनास कसे आले नाही, असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला आहे. स्‍थानिकांनी दिलेल्‍या माहितीनुसार मागील अनेक महिन्यांपासून या झाकणावरून बेस्ट बस आणि इतर वाहने ये–जा करत असल्‍याने या झाकणाची दुरवस्‍था झाली आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी पालिकेत माहिती दिली आहे. तसेच वाहतुक पोलिसांनी एका तरुणाच्या मदतीने या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला पडलेले पेव्हर ब्लॉक उचलून छोटीशी संरक्षण भिंत बनवली आहे. ज्‍यामुळे वाहन चालकांना लांबूनच झाकण तुटल्याची माहिती मिळेल व अपघात टाळता येईल. मात्र ही उपाय योजना तात्‍पुरती असून कायमस्‍वरूपी याची दुरुस्‍ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

'कडकनाथ'चे बुडवलेले बाराशे कोटी आधी शेतकऱ्यांना द्या; सदाभाऊंचे भाषण सुरू असतानाच भर सभेत युवकाचा सवाल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीची खरेदी का केली जाते? जाणून घ्या कारण अन् महत्व

SCROLL FOR NEXT