मुंबई

महावितरणच्या बिलावरील अस्पष्ट फोटोच्या प्रमाणात घट

CD

महावितरणच्या बिलावरील अस्पष्ट फोटोच्या प्रमाणात घट
सहा महिन्यांच्या मोहिमेनंतर विक्रमी नीचांक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : गेल्या सहा महिन्यांत वीज मीटरच्या अस्पष्ट फोटोंचे प्रमाण दोन टक्क्यांपेक्षाही कमी झाल्याचा दावा महावितरण कंपनीने केला आहे. हे प्रमाण जानेवारी महिन्यात दीड टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. परिणामी, ग्राहकांच्या वीजबिलांविषयीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली. वीज ग्राहकांना अचूक वीजबिले मिळावीत, यासाठी महावितरणने चालविलेल्या मोहिमेला यश येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

एकेकाळी ४६ टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात अस्पष्ट फोटोचे प्रमाण होते. ते आता दोन टक्‍क्‍यांहून कमी झाले आहे.

असे दिले जाते बिल
महावितरणच्या ग्राहकांच्या वीज मीटरचे फोटो काढले जातात व त्यांच्या आधारे वीजवापराच्या आकडेवारीची नोंद केली जाते. त्यानुसार ग्राहकांना विजेची बिले दिली जातात. मीटर सदोष असेल किंवा बंद असेल, घराला कुलुप असल्याने मीटर रीडिंग करता येत नसेल, मीटरचे पॅनेल स्पष्ट दिसत नसेल किंवा मीटरचा फोटो अस्पष्ट असेल, तर सरासरी वीजबिले दिली जातात.

मोहिमेला यश
मीटरचे फोटो स्पष्ट असल्यामुळे ग्राहकांना त्यांच्या वीज वापराइतकी अचूक बिले दिली जातात. त्यामुळे त्यांच्या तक्रारी कमी होतात. तसेच महावितरणच्या महसुलातही वाढ होते. मीटरचे फोटो स्पष्ट असावेत व वीजवापराचे आकडे अचूक नोंदविले जावेत, यासाठी कंपनीने मोहीम राबवली. त्यामुळे एके काळी ४६ टक्क्यांवर असलेले मीटरच्या अस्पष्ट फोटोंचे प्रमाण खूप कमी झाले. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात हे प्रमाण २.३ टक्के होते. त्यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे हे प्रमाण आणखी कमी होऊन जानेवारी महिन्यात केवळ दीड टक्का इतके झाले.

कोणत्या परिमंडळात सर्वाधिक वीजबिले?
राज्यात सामान्य वीजबिलांचे प्रमाण ८९.८ टक्के
कल्याण परिमंडळ ९६.४ टक्के
नागपूर ९५.५ टक्के
कोल्हापूर ९५.५ टक्के
भांडुप ९५.२ टक्के
पुणे ९४.५ टक्के
गोंदिया ९५.७ टक्के

कोणत्या परिमंडलात किमान टक्केवारी?

मीटरच्या अस्पष्ट फोटोंच्या बाबतीतही या परिमंडलांची कामगिरी चांगली आहे. कोल्हापूर, नागपूर, गोंदिया, कोकण, कल्याण व भांडुप या परिमंडलात वीज मीटरच्या अस्पष्ट फोटोंचे प्रमाण प्रत्येकी एक टक्क्यांच्याही खाली गेले आहे.


पुणे, बारामती, अमरावती, जळगाव व नांदेड या परिमंडलांमध्ये वीज मीटरच्या अस्पष्ट फोटोंचे प्रमाणे एक ते दोन टक्के आहे. मीटरच्या अस्पष्ट फोटोंचे प्रमाण कमी करण्यात विविध परिमंडलांची कामगिरी वेगवेगळी आहे. राज्यातील हे एकूण प्रमाण जानेवारी महिन्यात दीड टक्का होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT