मुंबई

बारा डब्यांची लोकल चालली पुढे

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २३ : रेल्वे स्थानकातील बारा डब्यांच्या लोकल थांब्यामध्ये रेल्वे प्रशासनाने सोमवारपासून काही बदल केले आहेत. या बदलाचा फटका सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना बसत असून या निर्णयाविरोधात नाराजीचा सूर उमटत आहे. पंधरा ड‍ब्यांच्या लोकलच्या थांब्याच्या ठिकाणी आता बारा डब्यांच्या लोकलला देखील थांबा देण्यात आला आहे. रेल्वे फलाटावर बारा डब्यांची लोकलचे डब्बे पूर्व ठिकाणापासून पुढे जात असल्याची माहिती अनेक प्रवाशांना माहित नसल्याने लोकल पकडताना प्रवाशांची धांदल उडते. विशेष करुन महिला व प्रथम श्रेणीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसत असून महिला प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत.

कल्याण-डोंबिवली रेल्वे स्थानक ही मध्य रेल्वे मार्गावरील वर्दळीची ठिकाणे आहेत. मध्य रेल्वे मार्गावरील बारा डब्यांच्या धावणाऱ्या लोकल थांब्याच्या ठिकाणामध्ये रेल्वे प्रशासनाकडून बदल करण्यात आले आहेत. सोमवारपासून हे बदल लागू झाले आहेत. कल्याण डोंबिवली रेल्वे स्थानकांचा विचार करता या रेल्वे स्थानकांत यापूर्वी पंधरा व बारा डब्‍ब्‍यांच्‍या लोकलचे थांबे हे स्वतंत्र होते. त्यानुसार किती डब्ब्यांची लोकल येत आहे त्यानुसार प्रवासी थांबत होते.

आता पंधरा डबा लोकल ज्या थांब्यावर स्थानकात फलाटावर थांबत होती. त्या थांब्यावर बारा डब्याची लोकल सोमवारपासून थांबू लागली आहे. आता स्थानकात तीन डब्‍बे पुढे जाऊन बारा डब्याची लोकल थांबू लागल्याने प्रवाशांची तारांबळ उडत आहे. नवख्या प्रवाशांना हे जुळून घेताना त्रास सहन करावा लागतो. ज्येष्ठ नागरिक, वृध्द यांना तर समोर आलेली लोकल सोडून द्यावी लागत असल्‍याचे प्रवाशांनी सांगितले.
-----------------------------------
प्रवासी उन्‍हात, रेल्‍वे जोमात
फेरबदलामुळे महिला प्रवाशांचे, प्रथम श्रेणीच्या डब्यांच्या स्थानकात उभे राहण्याच्या रचनेत बदल झाले आहेत. प्रवाशांना आता नवीन जागेत उभे राहून डबा पकडावा लागतो. पंधरा डब्‍ब्‍याची लोकल यापूर्वी ज्या ठिकाणी उभी राहत होती. तेथे स्थानकांवर अनेक ठिकाणी निवारा नाही. प्रवाशांना उन्हात उभे राहून लोकल पकडावी लागते. किंवा अगोदर सावलीचा आधार घ्यावा लागतो. कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक चार, पाच, सहा, सात, डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक चार, पाच वर प्रवाशांचा गोंधळ उडत आहे.
-------------------------------

नव्‍या बदलामुळे महिला प्रवासी, ज्येष्ठ नागरिक यांची धावपळ होत आहे. याच बारा डब्‍ब्यांच्या लोकलला तीन नवीन डब्‍ब्यांची जोड करत सर्वच लोकल या पंधरा डब्‍ब्यांचा करण्याचा निर्णय प्रशासनाने घ्यावा. यामध्ये महिलांसाठी वाढीव डब्बे असावे. महिला दिन जवळ येत असून महिला प्रवाशांना ही भेट देण्यास हरकत नाही. लोकलच्या डब्‍ब्यात, वेळापत्रकात बदल करण्याऐवजी रेल्वे स्थानकांतील समस्या दूर करण्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे असे वाटते.
-लता अरगडे, अध्यक्ष, तेजस्विनी महिला रेल्वे प्रवासी संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; सूत्रांची माहिती

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी अमित शहा आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT