मुंबई

शहरवासीयांना संविधानाचे धडे

CD

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २५ ः नवी मुंबई महापालिकेने ऐरोली येथे अत्यंत भव्यदिव्य आणि सुविधाजनक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारले आहे. हे स्मारक सतत कृतिशील राहील, यादृष्टीने विविध उपक्रम राबविण्यावर भर दिला आहे. आता एक पाऊल पुढे टाकत महापालिकेतर्फे लवकरच शहरातील सर्व नागरीकांना संविधानाची ओळख व्हावी आणि त्याचे परिपूर्ण ज्ञान मिळावे यासाठी अभियान राबवण्यात येणार आहे. ऐरोलीतील स्मारकात संविधान रोजच्या जगण्यात या पार पडलेल्या कार्यशाळेत महापालिकेतर्फे अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांनी माहिती दिली.
या कार्यशाळेला ही सेवानिवृत्त सनदी अधिकारी इ. झेड. खोब्रागडे, अतिरिक्त आयुक्त संजय काकडे व सुजाता ढोले, समाजविकास विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, उपआयुक्त सोमनाथ पोटरे व डॉ. श्रीराम पवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील, स्मारकाच्या नियंत्रक अधिकारी संध्या अंबादे, मुंबई विद्यापिठाचे राज्यशास्त्र प्रा. डॉ. मृदुल निळे, एशियन कॉमनवेल्थ लोकल गव्हर्नमेंट फोरमच्या विभागीय कार्यक्रम व्यवस्थापक अनुया कुंवर, रिसोर्स ॲण्ड सपोर्ट सेंटर फॉर डेव्हलपमेंटचे संचालक भीम रासकर, संविधान अभ्यासक व प्रचारक सुरेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. भारतीय संविधानाचे पालन करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. संविधानाचे महत्त्व जाणून नवी मुंबई महापालिकेने स्वयंस्फूर्तीने त्यादृष्टीने पुढाकार घेत संविधान विषयक उपक्रम राबविण्यास सुरुवात केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे माजी मुख्य सचिव तथा राज्य निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त जे.एस. सहारिया यांनी महापालिका प्रशासन आणि अधिकाऱ्यांचे प्रशंसा केली. नवी मुंबई महापालिका समाजविकास विभागातर्फे महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गर्शनाखाली भारतीय संविधान निर्मितीच्या पंच्याहत्तरी निमित्त आयोजित ‘संविधान रोजच्या जगण्यात’ या कार्यशाळेच्या शुभारंभप्रसंगी माजी मुख्य सचिव जे.एस. सहारिया आपले मनोगत व्यक्त करीत होते. यावेळी बोलताना माजी सनदी अधिकारी तथा संविधान दिन या संकल्पनेचे शिल्पकार इ.झेड. खोब्रागडे यांनी नवी मुंबई महापालिकेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना साजेसे स्मारक उभे केले असून संविधानाने आपल्याला दिलेल्या दिशेने प्रामाणिकपणे वाटचाल करावी एवढीच प्रत्येक नागरिकाकडून अपेक्षा असल्याचे सांगितले. संजय काकडे यांनी महापालिकेची कार्यशाळा आयोजनामागील भूमिका मांडताना प्रत्येक सामान्य नागरिकांसमोर आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग असणाऱ्या संविधानाची माहिती पोहचावी व ती त्याला समजेल अशा भाषेत सांगावी यादृष्टीने महापालिका प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. नागरिक संविधानाने दिलेल्या आपल्या हक्काबाबत जागरूक असतात मात्र मूलभूत कर्तव्य पालनाची जाणीव ठेवत नाहीत हे लक्षात आणून देत ‘नवी मुंबई ही पहिली संविधान साक्षर महापालिका’ बनविण्यासाठी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार नियोजनबद्ध प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. मृदुल निळे यांनी रोजच्या जगण्यातील संविधान या अभिनव उपक्रमाचे ५ विषयांनुसार सादरीकरण करून मांडणी केली. एशियन कॉमनवेल्थ लोकल गव्हर्नमेंट फोरमच्या विभागीय कार्यक्रम व्यवस्थापक अनुया कुंवर यांनी या ५ उपक्रमांबाबत गटनिर्मिती करून गटचर्चा घडवून आणली व या विषयानुरूप गटांमधील चर्चेचे निष्कर्ष काढण्याची कार्यवाही केली. संपूर्ण दिवसभरात विविध सत्रांमधून ‘संविधान रोजच्या जगण्यात’ हा उपक्रम राबविण्यासाठी गटनिहाय चर्चा करण्यात आली. यामध्ये १० ते १२ व्यक्तींचे गट बनवून हर घर संविधान साक्षर, संविधान स्तंभदर्शन, संविधान परिचय प्रमाणपत्र, संविधान प्रचारक, लोकशाही उत्सव या पाच विषयांवर गटांमध्ये चर्चा घडवून आणण्यात आली.
---------------------------
लोकसहभागावर भर
या गटचर्चेमध्ये प्रत्येक गटाने आपल्या विषयानुरूप लोकसहभाग कसा वाढेल याविषयी मांडणी करावी, या विषयास अनुसरून सर्व स्तर तसेच विभिन्न सामाजिक समूहातून नेतृत्व पुढे कसे येईल याविषयी चर्चा घडवून निष्कर्ष काढावेत, संविधान विषयक उपक्रमांसाठी स्मारकाचा प्रभावी वापर करण्याबाबत विचार विनिमयातून मुद्दे काढावेत, उपक्रमात जाणवणार्‌या त्रुटींवरही विचार करावा व त्रुटी दूर करण्यासाठी उपाययोजना सुचवाव्यात, उपक्रम सर्वदूर प्रसारित होण्यासाठी संकल्पना मांडाव्यात तसेच धोरण स्वरूपात हा उपक्रम मांडण्यासाठी काय करता येईल याची आखणी करावी अशा विविध बाबींबाबत प्रत्येक गटात आपापल्या विषयांनुसार सविस्तर चर्चा झाली. या चर्चेतून निघालेले सार प्रत्येक गटाच्या प्रतिनिधीने मंचावर सादरीकरण करून सर्वांसमोर मांडले.
-----------------------------
मुंबई विद्यापीठाचा कोर्स सुरु करणार
या पाचही विषयांवर आधारित सादरीकरणात मांडल्या गेलेल्या मुद्यांचा सर्वंकष विचार करून समाजविकास विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी नवी मुंबई महापालिकेतर्फे पहिल्या टप्प्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. यामध्ये मुंबई विद्यापीठाच्या सहयोगाने ‘संविधान परिचय प्रमाणपत्र कोर्स’ सुरु करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये महाविद्यालयीन तरुणांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी हा कोर्स उपयोगी ठरेल असेही ते म्हणाले. प्रत्येक महिन्यात स्मारकामध्ये संविधान विषयक चर्चा, परिसंवाद, पुस्तक समीक्षा अशा विविध प्रकारे एक कार्यक्रम आयोजित करण्याविषयी त्यांनी भाष्य केले.
------------------------------------
घरोघरी संविधान पोहोचवणार
भारतीय संविधान निर्मितीच्या २६ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या पंच्याहत्तरीपूर्वीच नवी मुंबई महापालिकेने घरोघरी संविधान पोहचवण्याचा निर्धार केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात पार पडलेल्या या कार्यशाळेच्या माध्यमातून त्यासाठी प्रशिक्षित प्रचारक तयार केले जाणार आहे. त्याअनुषंगाने महापालिकेतर्फे सकारात्मक पाऊल उचलण्यात आलेले आहे. या कार्यशाळेस उपस्थित राज्याच्या विविध जिल्ह्यातून आलेल्या प्रतिनिधींनीही नवी मुंबई महापालिकेच्या या पुरोगामी दृष्टिकोनाचे कौतुक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

SCROLL FOR NEXT