मुंबई

मुलांनी पुस्तकाशी मैत्री करावी!

CD

अंबरनाथ, ता. २७ (बातमीदार) : मुलांनी पुस्तकांशी मैत्री करावी, पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही. घरातून खाऊसाठीच्या उरलेल्या पैशांतून एकतरी पुस्तक घेऊन ते वाचावे. का जगायचे आणि कसे जगायचे याची शिकवण वाचनाद्वारे हमखास मिळते, असे प्रतिपादन बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांनी केले.
मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने साहित्य संपदा आणि परिवर्तन शिक्षण संस्था आयोजित, ज्ञानामृत विद्यालय आणि नूतन ज्ञानमंदिर व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी अंबरनाथच्या ज्ञानामृत शाळेमध्ये एकदिवसीय मराठी बालसाहित्याचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने श्रीमती देवकाबाई वराडे सभामंडपात उभारलेल्या कुसुमाग्रज वि. वा. शिरवाडकर व्यासपीठावर बालसाहित्यिका ज्योती कपिले यांच्या हस्ते बालसाहित्य संमेलनाचे उद्‌घाटन करण्यात आले. परिवर्तन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण वराडे, सचिव किसन वराडे, लेखिका प्रतिभा सराफ, साहित्य संपदा संस्थेचे संस्थापक वैभव धनावडे, राम नेमाडे, प्रा. रेखा मैड आदी साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
शाळा महत्त्‍वाचे सांस्कृतिक केंद्र असून शाळेतील शिक्षक मुलांना संस्कारित करतात. शिक्षण प्रगतिपथावर नेते. एकमेकांविषयी आदर ठेवावा, भविष्यात ते फार उपयोगी पडते, असे मत बाल साहित्यिका ज्योती कपिल यांनी व्यक्त केले. चला मुलांनो मैदानावर, विसरून टीव्ही आणि मोबाईलला... खेळायला प्राधान्य द्या, अशी कविता सादर करून त्यांनी मुलांशी संवाद साधला. शिक्षकांनी काढलेल्या शिक्षणसंस्था उत्तम चालतात. हे ज्ञानामृत संस्थेच्या प्रगतीवरून समजते, असे विचार साहित्यिक राम नेमाडे यांनी व्यक्त केले.
बालसाहित्य संमेलनाच्या निमिताने प्राचीन शिवमंदिरापासून शाळेपर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली. यामध्ये संमेलनाध्यक्ष एकनाथ आव्हाड, कार्याध्यक्ष किसन वराडे यांच्यासह शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षकवृंद सहभागी झाले होते.
-----------------------------------------
दालनाला साहित्यिकांची नावे
साहित्य संमेलनाच्या निमिताने शाळेमध्ये बालकवी, साने गुरुजी, मंगळवेढेकर, अण्णा भाऊ साठे, पाडगावकर, शांताबाई शेळके आदी साहित्यिकांची नावे दालनाला देण्यात आली होती. विविध लेखकांच्या पुस्तकांचे प्रदर्शन देखील भरवण्यात आले होते. दिवसभर चाललेल्या विविध परिसंवादात साहित्यिकांनी सहभाग घेतला. निवडक विद्यार्थ्यांचे काव्यवाचन आणि कथाकथन यांसारखे कार्यक्रमदेखील सादर करण्यात आले.
------------------------
मराठीमध्‍येच शिक्षण घ्‍या!
पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही. पुस्तक जीवनाची सुंदर भाग फुलवतात. खर्चातून काही पैसे बाजूला ठेवा, त्यातून एक पुस्तक खरेदी करा, वाचायची सवय लागेल. पुस्तकाचे भांडार होईल, शक्यतो मराठीमध्ये शिक्षण घ्यावे, असा सल्ला आव्हाड यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT