मुंबई

४८ व्यापाऱ्यांची फसवणूक करणारा अटकेत

CD

मुंबई, ता. २ : औषध निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल ४८ व्यापाऱ्यांकडून उधारीवर घेऊन त्याची परस्पर विक्री करत ४५ कोटींचा अपहार केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने दिल्लीतील व्यापाऱ्याला नुकतीच अटक केली. शरद विराणी असे अटक केलेल्या व्यावसायिकाचे नाव असून तो दिल्लीचा रहिवासी आहे. या प्रकरणात विराणीने आरोपींना मदत केल्याचा आरोप आहे.
व्यावसायिक संजय संघवी यांनी २०१६ मध्ये दाखल तक्रारीवरून त्यांच्यासह अन्य ४७ साक्षीदारांकडून सोमील एन्टरप्रायजेस प्रा.लि.चे संचालक आरोपी मितेश शहा, संजय शहा व इतर आरोपींनी औषध बनवण्यासाठीचा कच्चा माल ९० दिवसांच्या उधारीवर खरेदी केला होता. हा कच्चा माल पुढे आरोपींनी दिल्ली, हरियाणा आणि इंदूर येथील व्यापाऱ्यांना कोणतीही पावती न देता रोखीने विकला. तसेच सदर रक्कम तक्रारदार आणि साक्षीदारांना न देता परस्पर अपहार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला. एवढेच नव्हे, तर तक्रारदाराला पुढील तारखेचे धनादेश दिले होते; पण ते वठले नाहीत. याप्रकरणी सुरुवातीला लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यात २०१६ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढे ते आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. या प्रकरणात दिल्लीतील व्यावसायिक शरद विराणी याने त्यांच्या तीन कंपन्यांमार्फत अपहारातील कच्चा माल ५७ कोटी २३ लाख रुपयांचा माल पावतीशिवाय खरेदी केला. त्यामुळे विराणी याने मुख्य आरोपींना मदत केल्याचा आरोप आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT