मुंबई

खारघरकरांची दुर्गंधीतून मुक्ती

CD

खारघर, ता. ८ (बातमीदार) : खारघर सेक्टर दहा कोपरा खाडीत प्रदूषित सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीच्या दुरुस्तीचे काम प्रदूषण महामंडळाने हाती घेतले आहे. त्यामुळे खारघर सेक्टर दहा, आठ आणि दोनमधील रहिवाशांची दुर्गंधीतून सुटका होणार आहे.
तळोजा औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांकडून सोडण्यात येणाऱ्या प्रदूषणयुक्त सांडपाणी वाहून खाडी मार्गे खारघरमध्ये येत असल्याने येथील नागरिकांना याचा प्रचंड त्रास होत होता. याविषयी महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष करत असल्यामुळे रॅली काढून निषेध व्यक्त केला होता. दरम्यान, कोपरा खाडीत प्रदूषणयुक्त सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांचे पाईप निखळल्यामुळे दुर्गंधी पसरत असल्याचे दिसून आले होते. अखेर नवी मुंबई महाराष्ट्र राज्य प्रदूषण महामंडळ कार्यालयातील अधिकाऱ्यांनी या वाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.
-----------------------------
तळोजा औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांचे सांडपाणी बेलापूर खाडीत सोडले जाते. त्यासाठी प्रदूषण महामंडळाने सांडपाणी वाहिनी उभारली आहे.;मात्र कोपरा खाडीत जवळपास वीस मीटर अंतरावरील दोन पाईप निखळून पडल्याने सर्व दुर्गंधीयुक्त सांडपाणी सेक्टर दहा वसाहतीलगत असलेल्या कोपरा खाडीत मिश्र होत असल्यामुळे दुर्गंधी पसरत आहे.
- नरेश ठाकूर, माजी नगरसेवक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT